आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूझरने या मराठी अभिनेत्रीला म्हटले \'वेश्या\', जाणून घ्या बॉयफ्रेंडने काय उत्तर दिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा - Divya Marathi
अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा
मुंबई: टीव्ही अभिनेता आणि होस्ट करण कुंद्राची गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरने सोमवारी (27 जून) सिझलिंग फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. तिच्या काही चाहत्यांनी या फोटोला सुंदर म्हटले. तसेच @kkundra00 नावाच्या यूझरने या फोटो खूपच अश्लिल कमेंट केल्या. या कमेंट वाचल्यानंतर करण कुंद्राने टिकाकारांना सडेतोड उत्तर दिले. 
 
जेव्हा टिकाकारांनी अनुषाला म्हटले वेश्या...
- अनुषाचा हॉट फोटोवर @kkundra00 नावाच्या यूझरने कमेंट बॉक्समध्ये करण कुंद्राला टॅग करून लिहिले, \'ती वेश्यासारखी दिसते. हा चांगला फोटो नाहीये. तू तिला कसे गर्लफ्रेंड बनवू शकतो. ती निर्लज्ज आहे.\'
- ही कमेंट वाचल्यानंतर करणने मोठी पोस्ट लिहून टिकाकाराला उत्तर दिले. भडकलेल्या करणने लिहिले, \'माझा फोटो आणि नाव वापरणारे चाहते मला नकोत. ज्यांची विचार करण्याची क्षमता इतक्या खालच्या पातळीची आहे.\'
- त्या यूझरला उत्तर देताना करणने लिहिले, \'तुझ्या या कमेंटवरून असेच वाटते, की तुझ्या आई-वडिलांनी तुला हेच शिकवले. मी तुला नाही या गोष्टीसाठी तुझ्या कुटुंबाला दोष देतोय.\'
- अनुषाबाबत अश्लिल कमेंट करण्यापासून करणचा फोटो आणि नाव वापरण्यावरूनसुध्दा त्याने यूझरला झापले. 
- काही वेळानंतर सर्व कमेंट आणि @kkundra00 नावाचे अकाऊंट इंस्टाग्रामवरून डिलीट झाले. 
 
एअरपोर्टवर पहिल्यांदा भेटले होते करण-अनुषा...
- अलीकडेच divyamarathi.comला दिलेल्या एका मुलाखतीत करणने कबूल केले होते, की तो अनुषाला डेट करतोय आणि दोघे एकमेकांमुळे आनंदी आहेत. 
- करणने सांगितले होते, \'आम्ही दोघांनी एकत्र एमटीव्हीसाठी काम केले. परंतु अनुषासोबत माझी पहिली भेट एअरपोर्टवर झाली. आम्ही एमटीव्हीच्या एका शोसाठी यूरोपला जात होतो. यूरोप ट्रिपमध्ये आम्ही 6-7 दिवस एकत्र राहिलो. त्यादरम्यान एकमेकांना समजून घेतले आणि मैत्री झाली.\'
- दोघांचे इंस्टाग्राम अकाऊंट एकमेकांच्या क्युट फोटोंनी ओसांडून वाहत आहे. सध्या दोघे एकमेकांची कंपनी एन्जॉय करत आहेत. 
 
अनुषापूर्वी कृतिकला करत होता डेट... 
- \'कितनी मोहब्बत है\', \'रोडीज\', \'प्यान तूने क्या किया\'सारख्या शोमध्ये काम केलेला करण अनुषापूर्वी कृतिका कामरासोबत रिलेशनशिपमध्ये होता.
- \'कितनी मोहब्बत है\'च्या सेटवर दोघांनी जवळीक वाढली होती. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुषाचे तो फोटो, ज्याच्या कमेंट्सवर भडकला करण...
 
बातम्या आणखी आहेत...