आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ये रिश्ता क्या कहलाता है\'चा \'नैतिक\' झाला बाबा, पत्नी निशाने दिला मुलाला जन्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नैतिकची भूमिका साकारुन प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता करण मेहराला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. त्याची पत्नी निशा रावल हिने बुधवारी रात्री मुलाला जन्म दिला. करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर न्युबॉर्न बेबीच्या पायाचा फोटो शेअर करुन लिहिले, "याला आमच्या हृदयात किती मोठे स्थान आहे, हे मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही. आम्ही दोघेही आमच्या मुलासोबत आयुष्याच्या नवीन प्रवासासाठी तयार आहोत."  करण आणि निशाचे हे पहिले बाळ आहे.
 
6 वर्षे डेटिंग केल्यानंतर केले होते लग्न..
- करण आणि निशा यांनी सहा वर्षे डेटिंग केल्यानतंर नोव्हेंबर 2012 मध्ये लग्न केले होते.
- 'बिग बॉस-10'चा स्पर्धक राहिलेला करण सध्या 'खटमले इश्क' या मालिकेत काम करत आहे.
- निशासुद्धा टीव्ही अभिनेत्री आहे. पण काही काळापासून ती ब्रेकवर आहे.
- निशाने 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' (2012), 'आने वाला पल' (2001), 'केसर' (2007) या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. 
- करण आणि निशा रिअॅलिटी शो 'नच बलिए' (2012-13) मध्ये एकत्र झळकले होते.
- निशा टीव्ही मालिकांसोबतच निवडक हिंदी सिनेमांमध्येही झळकली आहे. 'रफू चक्कर' (2008), 'हंसते-हंसते' (2008), 'जैक एंड झोल' (2010), 'टॉम डिक हॅरी रॉक अगेन' (2011) हे निशाचे सिनेमे आहेत. 

मे महिन्यात झाले होते निशाचे बेबी शॉवर... 
- मागील महिन्यातच निशाचे डोहाळे जेवण झाले होते. यावेळी तिने फ्लोरल पिच कलरचा डिझायनर ड्रेस घातला होता. 
- निशासाठी डिझायनर रोहित वर्माने हा ड्रेस डिझाइन केला होता.
- निशा आणि करणने केक कापून यावेळी सेलिब्रेशन केले होते. 
- निशाच्या डोहाळे जेवणाला टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. 
- निशाने डोहाळे जेवणाचे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करुन लिहिले होते, '& finally the much awaited shower pix... To all my dearies who dolled me up:This pretty floral peach dress made with so much love - my darling @rohitkverma ❤'.  
 
पुढील स्लाईड्सवर बघा, निशाने शेअर केलेले डोहाळे जेवणाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...