आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अॅक्टरने केले कोर्ट मॅरेज, परंतु पत्नीसोबत एका घरात राहू शकत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता रमन हांडा आणि दिव्या आर्य कोर्ट मॅरेजवेळी)
मुंबई- 'राखी का स्वयंवर' आणि 'हॅलो प्रतिभा'सारख्या मालिकांमध्ये दिसलेला अभिनेता रमन हांडाने बोहल्यावर चढला आहे. गेला काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रध्दा आर्यची बहीण दिव्या अर्यासोबत त्याने याचवर्षी 10 मे रोजी कोर्ट मॅरेज केले आहे.
दिव्याच्या घरच्यांना समजावणे होते कठिण-
आपल्या लग्नाविषयी रमन सांगतो, 'बॉलिवूड आणि टीव्ही जगात सध्या लग्न मोडल्याने लोकांचा स्टार्सवरील विश्वास उडाला आहे. एका अभिनेत्याला मुलाच्या घरच्यांची समजून घालण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आजकाल प्रत्येक वडील आपल्या मुलीसाठी बिझनेसमन किंवा एखादा प्रोफेशन व्यक्ती शोधतो. परंतु एका अभिनेत्यासोबत आपल्या मुलाचे लग्न करण्यापूर्वी पालक हजारदा विचार करतात. हेच सर्व माझ्यासोबतसुध्दा घडले आहे. दिव्याची बहीण अभिनेत्री आहे, परंतु तिचे स्वत:चे इंडस्ट्रीशी काहीही एक संबंध नाहीये. आमच्या दोघांवर एकसारखा दबाव होता. आम्ही दिव्याच्या पालकांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही त्यांना एकमेकांवर खूप प्रेम करतो हे पटवून दिले, तेव्हा त्यांना विश्वास बसला. यावरसुध्दा अटी होत्या, की आधी आम्हाला कोर्ट मॅरेज करावे लागेल. त्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावले लागले.'

एकाच घरात नाही राहू शकत रमन आणि दिव्या-
रमन आणि दिव्या यांनी कोर्टात लग्न केले, मात्र सध्या ते एका घरा राहू शकत नाहीत. दिव्याच्या पालकांनी अट ठेवली होती, की जोपर्यंत त्यांचे हिंदू प्रथेप्रमाणे लग्न होणार नाही, तोपर्यंत ते सोबत राहू शकत नाहीत. दिव्या आणि रमन सध्या वेगवेगळे राहत आहेत.
26 नोव्हेंबरला होणार हिंदू प्रथेप्रमाणे लग्न-
रमनच्या सांगण्यानुसार, त्याचे बालपणीपासून स्वप्न होते, की त्याचे लग्न धूमधडाक्यात व्हावे. त्याला त्याच्या स्वप्नांशी कोणत्याही प्रकारची तडजोड करायचे नाहीये. त्यामुळे दोघांचे लग्न हिंदू प्रथेप्रमाणे 26 नोव्हेंबर 2015 रोजी लग्न होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोर्ट मॅरेजदरम्यानची रमन आणि दिव्याचे काही फोटो...