आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BDAY: साखरपुड्यापासून ते हनीपूनपर्यंत, पाहा पत्नीसोबतचे \'मधुबाला\'च्या RK चे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: पत्नी वाहबिज दोराबजीसोबत विवियन दसेना)
मुंबईः ‘मधुबाला-एक इश्क एक जुनून’ या मालिकेत आर. के. ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता विवियन दसेना 27 वर्षांचा झाला आहे. विवियनचा जन्म 28 जून 1988 मध्ये मध्यप्रदेशातील उज्जैन या शहरात झाला. मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारा विवियन आज टीव्ही इंडस्ट्रीतील चर्चित चेहरा बनला आहे.
विवियनने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र इंजिनिअरिंगमध्ये तो रमला नाही आणि त्याने अभिनय क्षेत्राची निवड केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवियनने ग्लॅडरेग्स मॅनहंट कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला. या स्पर्धेत टॉप 10 मध्ये त्याने स्थान प्राप्त केले.
तीन मालिकांमध्ये केले काम
2009 मध्ये कलर्स वाहिनीच्या 'अग्निपरिक्षा जीवन की गंगा' या मालिकेद्वारे विवियनने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 2011 मध्ये 'प्यार की ये एक कहानी' या मालिकेत तो झळकला. या मालिकेतील अभय रायचंद या मालिकेद्वारे त्याला पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली. तर 2012 ते 2014 या काळात छोट्या पडद्यावर प्रसारित झालेल्या 'मधुबाला: एक इश्क एक जुनून' या मालिकेच्या माध्यमातून त्याला यश आणि लोकप्रियता दोन्ही मिळाली.
टीव्ही अभिनेत्रीसोबत थाटले लग्न
विवियनने जानेवारी 2013 मध्ये टीव्ही अॅक्ट्रेस वाहजिब दोराबजीसोबत लग्न केले. वाहजिब 'प्यार की ये एक कहानी' या मालिकेत झळकली. या मालिकेच्या सेटवरच दोघांचे सूत जुळले. डिसेंबर 2011 मध्ये दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर 2013 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे निवडक मित्र सहभागी झाले होते. लग्नानंतर इंडस्ट्रीतील लोकांसाठी ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. हनीमूनसाठी हे कपल ऑस्ट्रेलियाला गेले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा विवियनची पत्नी वाहबिजसोबतची मेंदी, संगीत, लग्न, पाठवणी आणि हनीमूनची खास छायाचित्रे...