आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Actor Siddharth Shukla Signs Three Film Deal With Karan Johar, Checkout His Modeling Days Pics

सिद्धार्थची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, करण जोहरचे 3 सिनेमे केले साईन, बघा मॉडेलिंग काळातील PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बालिका वधू' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी बॉलिवूडचे दार उघड झाले आहे. निर्माता करण जोहरच्या ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ या सिनेमाद्वारे सिध्दार्थ बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.
करण जोहरने सिद्धार्थ शुक्लाला ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ या आपल्या आगामी सिनेमासाठी साइन केले आहे. कलर्स वाहिनीवर प्रसारित होणा-या 'बालिका वधू' या मालिकेत शिवची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या सिद्धार्थबरोबर त्यांच्या बॅनरने तीन सिनेमांचा करार केला आहे.
सुशांत सिंह राजपूत (काई पो छे, शुद्ध देसी रोमान्स)च्या नंतर टीव्हीमधून सिनेमांत सिद्धार्थने मोठी उडी मारली. डान्स रिअँलिटी शो 'झलक दिखला जा'मध्ये सिद्धार्थने नृत्यकौशल्य बघायला मिळाले होते. या शोचा करण जोहर जज होते. करण आणि ‘हम्पटी..’चे दिग्दर्शक शशांक खेतान सिद्धार्थच्या कामावर खुश झाले. या सिनेमात सिद्धार्थबरोबर वरुण धवन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.
मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या सिद्धार्थची मॉडेलिंगच्या काळातील काही खास छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सिद्धार्थची मॉडेलिंगच्या काळातील छायाचित्रे...