आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TV अभिनेत्याने या सिंगरसोबत 17 महिन्यांपूर्वी केला होता साखरपुडा, आता केला खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण शर्मा आणि टियारा कार - Divya Marathi
करण शर्मा आणि टियारा कार
मुंबई: सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार पडद्यावर जेवढे मनमोकळे दिसतात, तेवढे ते पडद्यामागे नसतात. खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी लपून ठेवण्यात त्यांना रस असतो. 'मोही- एक ख्वाब के खिलने की कहानी' फेम टीव्ही अभिनेता करण शर्माने स्वत:चा साखरपुडा झाल्याची गोष्टी दीड वर्षे सर्वांपासून लपून ठेवली. नुकताच त्याचा साखरपुडा झाल्याचा खुलासा झाला आहे. त्याने गायिका टियारा कारसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वत: करणने साखरपुड्याचे रहस्य उलगडले आहे. करणने सांगितले, की साखरपुड्याला 17 महिने उलटून गेले आहे. मात्र अद्याप असेच वाटतेय, की आम्ही कालच एंगेजमेंट केली.
लग्नाच्या तयारीत आहे करण-टियारा...
दोघांनी त्यांच्या दिर्घकाळाच्या रिलेशनशिपमध्ये एकमेकांना समजून घेण्यासाठी पूरेसा वेळ दिला. करणच्या सांगण्यानुसार, माझे आई-वडील खूप व्यावहारिक आणि समजदारसुध्दा आहेत. त्यांनी माझ्यावर काहीच दबाव टाकला नाही. त्यांची इच्छा आहे, की मी लवकरात-लवकर सेटल व्हावे. म्हणून आम्ही आमच्या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अद्याप लग्नाची तारिख ठरलेली नाहीये. सध्या आम्ही लग्नासाठी तारिख शोधत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करण-टियाराचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...