आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 वर्षीय अभिनेत्रीने TV अभिनेता यश पंडितवर लावला बलात्काराचा आरोप, FIR दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: पीडितेसोबत अभिनेता यश पंडित
मुंबई- टीव्ही अभिनेता आणि 'स्प्लिट्सव्हिला-8' फेम यश पंडितवर 28 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. पीडित अभिनेत्रीचे म्हणणे आहे, की यशने तिला लग्नाचे आमिष दाखवून जुहू स्थित घरी बलात्कार केला. अभिनेत्रीच्या सांगण्यानुसार, यशने लग्न करणार असल्याचे सांगून अनेकदा बलात्कार केला. तिने खुलासा केला, की कुंटुंबाच्या प्रभावशाली कनेक्शमुळे पोलिसांनी त्याला अद्याप अटक केली नाहीये.
divyamarathi.comसोबत खास बातचीत करताना अभिनेत्रीने सांगितले, की यश सध्या फरार आहे आणि मुंबईच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी त्याला 27 नोव्हेंबरची तारिख मिळाली आहे. जुहू पोलिसांनी त्याच्यावर IPC कलम 406 किंवा 420 (फसवणूक) अंतर्गत प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप ही तक्रार IPCच्या कलम 376 (बलात्कार) अंतर्गत नोंदवली नाहीये.
काय म्हणतात पोलिस?
याविषयी जुहू पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस इन्स्पेक्टर सुनील घोसालकर यांचे म्हणणे आहे, 'या प्रकरणात मेमो इशू करण्यात आला आहे आणि तपास करणा-या अधिका-यांना बदलण्यात आले आहे. नवीन अधिकारी प्रकरणाचा तपास घेत आहेत. आमच्यावतीने जी काही मदत लागेल ती करू.'
काय आहे प्रकरण?
divyamarathi.comसोबत खास बातचीत करताना या घटनेविषयी पीडितेने सांगितले, 'टीव्ही सीरिअलच्या सेटवर 13 सप्टेंबरला माझी यशसोबत भेट झाली आणि आमच्यात मैत्री झाली. 7 ऑक्टोबरला त्याने मला त्याच्या अपार्टमेंटवर बोलावले. मात्र घरात जाण्यापूर्वी पार्किंग एरियामध्ये त्याने मला अनेक शब्द दिले आणि ओरल सेक्स करण्यासाठी राजी केले. त्यानंतर दोन आठवड्यांनी अर्थातच 29 ऑक्टोबर आणि 14 नोव्हेंबरला त्याने आई-वडिलांची भेट घालून देईल असा शब्द दिला होता. आई-वडिलांना भेटण्यासाठी त्याने मला पुन्हा फ्लॅटवर बोलावले. फिल्मी स्टाइलमध्ये त्याने माझ्या भांगात कुंकुं भरले आणि दोनवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.' बातम्यांनुसार, या प्रकरानंतर यश तिला दुर्लक्षित करायला लागला आणि तिच्या फोन-मेसेजला उत्तर देण्यास टाळू लागला. जेव्हा दोघांचा आमना-सामना झाला तेव्हा यशने तिला सांगितले, की आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो, शारीरिक संबंध ठेऊ शकतो, मात्र आपले लग्न होणे कठिण आहे.
अनेक तरुणींसोबत ठेवले आहे शारीरिक संबंध-
अभिनेत्रीचे म्हणणे आहे, 'पोलिसांची वागणूक पाहून मी स्तब्ध झाले. यशला केवळ शरीरिक संबंध ठेवायचे होते. त्याने माझ्यासमोर याची कबूली दिली, की त्याने अनेक तरुणींसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. या तरुणी बदनामी होण्याच्या भितीने पोलिसांपर्यंत पोहोचल्या नाहीत. परंतु मी त्याला धडा शिकवणार आहे आणि त्याचा खरा चेहरा लोकांसमोर आणणार आहे.' पीडित पुढे सांगते, 'तसे पाहता, पोलिसांनी IPCच्या 420 आणि 377 या कलम अंतर्गत तक्रार दाखल करायला हवी होती. जेणेकरून हे प्रकरण मजबूत झाले असते. नक्कीच पोलिसांवर दबाव असावा, त्यामुळे यशला अद्याप अटक करण्यात आली नाहीये.'
फरार आहे यश-
अभिनेत्रीने सांगितले, की 'FIR दाखल केल्यानंतर मी स्वत: DCP सत्यनारायण चौधरी यांच्याशी वैयक्तिकरित्या यश आणि त्या कुटुंबाच्या बॅकग्राऊंडविषयी बातचीत केली. जेव्हा यश घरी असल्याचे मला कळत होते, तेव्हा मी पोलिसांना सांगत होते. पोलिस तिथे इन्व्हेस्टिगेशन टीम पाठवायचे. मात्र यश कधीच त्यांच्या हाती लागला नाही. कारण नेहमीच एका मिस्टीरिअस फोन कॉलच्या माध्यमातून त्याच्या घरचे सावध व्हायचे आणि कुटुंबीय त्याला फरार असल्याचे सांगत.'