मुंबई - आज 'फादर्स डे'. इतर कोणत्याही दिवशी केवळ आईचे गुणगान आपण करत असतो. पण हा एक असा दिवस असतो जेव्हा आपल्याला आपल्या वडिलांची, त्यांच्या प्रेमाची आणि कष्टाची जास्त जाणीव होते आणि ते खरेही आहे. आपल्याला जाणवू न देता आपल्यासाठी निरंतर कष्ट करत असतात त्या आपल्या वडिलांसाठी हा खास दिवस आपण साजरा करतो. त्यात टीव्ही सेलिब्रेटीही मागे नाहीत.
आजच्या दिवशी आपल्या वडिलांवरील प्रेम त्यांनीही व्यक्त केले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी..