Home »TV Guide» TV Actors Holi Celebration Will Surely Amaze You!

कुणाच्या हातात दिसली बिअर, कुणी प्यायला हुक्का, यंदाच्या होळीत या अंदाजात दिसले TV स्टार्स

किरण जैन | Mar 14, 2017, 17:04 PM IST

मुंबईः सोमवारी धुळवडीच्या निमित्ताने एका खासगी वाहिनीच्या वतीने होळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींचा वेगळाच थाट बघायला मिळाला. सुशांत सिंह राजपूतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यावेळी चक्का हुक्का पिताना दिसली. तर मोना सिंह बिअरची कॅन दाखावताना दिसली. अंकिता आणि मोना यांच्या व्यतिरिक्त एकता कपूर, अविका गौर, क्रिस्टल डिसूजा, तान्या शर्मा, मनीष रायसिंघानी, श्वेता बसु प्रसाद, रोहन मेहरा आणि कांची सिंहसह अनेक सेलेब्स पार्टीत उपस्थित होते.

अंकिताला व्हायचे होते भांगेच्या नशेत धुंद...
अंकिताने यावेळी divyamarathi.com सोबत बोलताना सांगितले, "मला रंग खूप पसंत आहे. माझे आयुष्यसुद्धा सुंदर रंगानी परिपूर्ण व्हावे, अशी माझी इच्छा आहे. यंदा मी माझ्या मित्रांसोबत होळी सेलिब्रेट करतेय. प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे मला भांगेच्या नशेत धुंद व्हायचे आहे."

पुढील स्लाईड्सवर बघा, होळी पार्टीतील टीव्ही स्टार्सचे PHOTOS...

Next Article

Recommended