आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'झी रिश्ते अवॉर्ड्स'मध्ये टीव्ही स्टार्सनी लावले चारचाँद, शब्बीर झाला निराश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('झी रिश्ते अवॉर्ड्स'च्या मंचावर अनन्या अग्रवाल आणि मधुरिमा तुली)
मुंबईः अलीकडेच मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर 'झी रिश्ते अवॉर्ड्स 2014' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 14 डिसेंबर रोजी झी टीव्हीवर हा सोहळा प्रसारित केला जाणार आहे.
फेवरेट भावाचा अवॉर्ड घ्यायला पोहोचला नाही गणेश
'झी रिश्ते अवॉर्ड्स 2014' मध्ये फेवरेट भावाचा पुरस्कार दर्पणचा भाऊ गणेश ('बंधन... सारी उमर हमें संग रहना है' या मालिकेतील गणेश हत्ती)ला मिळाला. मात्र गणेश अर्थातच छोटा हत्ती मुंबईपासून दूर उमरगाव (गुजरात)मध्ये शूटिंगस्थळी आहे. त्यामुळे हा पुरस्कार त्याची बहीण दर्पण अर्थातच बालकलाकार अन्नया अग्रवालने स्वीकारला.
शब्बीर झाला निराश
'जमाई राजा' या मालिकेतील सिद्धार्थ आणि रोशनी अर्थातच निया शर्मा आणि रवी दुबे यांना फेवरेट जोडीचा मान मिळाला. तेव्हा 'कुमकुम भाग्य' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता शब्बीर अहलुवालिया निराश दिसला. शब्बीर जेव्हा डोक्यावर हात ठेऊन निराश दिसला, तेव्हा त्याच्या शेजारी बसलेली अभिनत्री श्रुती झा त्याचे सांत्वन करताना दिसली.
'झी रिश्ते अवॉर्ड्स'मध्ये तीन मालिकांना करण्यात आले सन्मानित
आता प्रत्येक वाहिनी आपल्या प्रतिस्पर्धी वाहिन्यांवरील मालिकांनाही सन्मानित करु लागली आहे. यंदा 'झी रिश्ते अवॉर्ड्स' इतर तीन वाहिन्यांवर प्रसारित होणा-या मालिकांना देण्यात आला. यामध्ये स्टार प्लस वाहिनीवरील 'दीया और बाती हम', कलर्स वाहिनीवरील 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' आणि सोनी वाहिनीवर गेल्या सतरा वर्षांपासून सुरु असलेल्या 'सीआयडी' या मालिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'झी रिश्ते अवॉर्ड्स' सोहळ्यातील निवडक छायाचित्रे...