आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्काने काढली अनोखी मेहंदी, हातावर लिहीले श्लोक, मंगळसुत्राची डिझाईनही आहे युनिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही शो 'नागिन' फेम आश्का गोराडिया तिचा बॉयफ्रेंड ब्रेंड ग्लोबसोबत आज हिंदू पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहे. शुक्रवारी या दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. शनिवारी आश्काची मेहंदी सेरेमनी झाली त्यावेळी तिने हातावर डिझाईन न काढता स्लोकाच्या लाईनी लिहिल्या. 

 

आश्काचे मानणे आहे की श्लोक विवाहाचे प्रतिक असते. त्यामुळे तिने हातावर श्लोक लिहीले. इतकेच नाही तर लग्नादरम्यान ती जे मंगळसुत्र घालणार आहे तेसुद्धा फार युनिक असणार आहे. आश्काने हातावर 'सत्यम, शिवम, सुंदरम'चा टॅटूही काढला आहे. मेहंदी सेरेमनीमध्ये अनेक सेलिब्रेटीही सहभागी झाले. घटस्फोटीत आहे आश्का...

 

आश्का गोराडियाने 2006 साली रोहित बक्शीसोबत लग्न केले होते. जवळपास 10 वर्षांनी आश्का आणि रोहित वेगळे झाले. आश्काने 2016 सालीच ब्रेंटला डेट करणे सुरु केले आणि त्याचवर्षी साखरपुडाही केला. आश्काने 'कुसुम' (2003), 'क्योंकि सास भी कभी बहू थी' (2004), 'कहीं तो होगा' (2006), 'विरुद्ध' (2007), 'मेरे अपने' (2007), 'सात फेरे' (2008), 'लागी तुझसे लगन' (2010) यांसारख्या मालिकांत काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आश्काच्या मेहंदी सेरेमनीचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...