आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटीत अॅक्ट्रेसने विदेशी बॉयफ्रेंडसोबत केले दुसरे लग्न, पाहा Wedding Album

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेंट ग्लोब आणि आश्का गोराडियाच्या वेडिंगमध्ये पोहोचली मौनी रॉय आणि अदा खान. - Divya Marathi
ब्रेंट ग्लोब आणि आश्का गोराडियाच्या वेडिंगमध्ये पोहोचली मौनी रॉय आणि अदा खान.

मुंबई - टीव्ही शो 'नागिन' फेम आश्का गोराडिया शुक्रवारी लग्नाच्या बंधनात अडकली. आश्काने तिचा विदेशी बॉयफ्रेंड ब्रेंट ग्लोबसोबत ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. यांच्या वेडिंगचे फोटोज समोर आले आहेत. लग्नामध्ये आश्काने व्हाइट फ्लोरल वर्कचा गाऊन परिधान केला होता तर ब्रेंट ब्लू अँड व्हाइट कलरचा कोर्ट पँटमध्ये होता. 

 

मौनी रॉयसह हे सेलेब्स झाले सहभागी... 
- आश्काच्या वेडिंगला तिची क्लोज फ्रेंड आणि को-अॅक्ट्रेस मौनी रॉय उपस्थित होती. 
- मौनी फ्रेंडच्या वेडिंगमध्ये ब्लू कलरच्या लाँग गाऊनध्ये गॉर्जियस दिसत होती. तिच्यासोबत अदा खानही या वेडिंगमध्ये लक्ष वेधून घेत होती. 
- जूही परमार, करणवीर बोहरा, टीजे सिंधूसह अनेक सेलेब्स आश्काच्या वेडिंगला उपस्थित होते. 
- शुक्रवारी ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाल्यानंतर आता आश्का 3 डिसेंबरला ट्रॅडिशनल इंडियन स्टाइलने लग्न करणार आहे. याची तयारी आजपासून सुरु झाली. 
- शनिवारी आश्काची मेहंदी आणि संगीत सेरेमनी होईल. त्यानंतर 3 तारखेला ते इंडियन स्टाइलने विवाहबद्ध होतील. 

 

घटस्फोटीत आहे आश्का 
- आश्का गोराडिया घटस्फोटीत आहे. तिने 2006 मध्ये रोहित बक्षीसोबत लग्न केले होते. 
- जवळपास 10 वर्षे रोहितसोबत राहिल्यानंतर 2016 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 
- 2016 मध्येच आश्का ब्रेंटला डेट करायला लगाली होती. त्याचवर्षी त्यांनी साखरपूडा केला होता. 

 

'क्योंकि सास भी कभी बहू थी'मध्ये होती आश्का 
आश्काने 'कुसुम' (2003), 'क्योंकि सास भी कभी बहू थी' (2004), 'कहीं तो होगा' (2006), 'विरुद्ध' (2007), 'मेरे अपने' सारख्या सीरियल्समध्ये काम केले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहे, वेडिंग अल्बम... 

बातम्या आणखी आहेत...