आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महाराणा प्रताप'मध्ये बनली होती महाराणी, आता भयंकर परीच्या भूमिकेत अवतरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- आश्का गोराडिया)
मुंबईः टीव्ही अभिनेत्री आश्का गोराडिया लवकरच सब टीव्हीवर प्रसारित होणा-या 'बालवीर' या मालिकेत भयंकर परीच्या भूमिकेत अवतरणार आहे. यापूर्वी या भूमिकेसाठी सोनाली बेंद्रे आणि अमृता रावला विचारणा झाल्याचे कळते. मात्र आता आश्काची वर्णी या भूमिकेसाठी लागली आहे.
स्वतः आश्काने याची पुष्टी केली आहे. तिने सांगितले, "बालवीरमध्ये मी भयंकर परीची भूमिका साकारत आहे. हा माझ्या करिअरमधील आजवरचा खूप वेगळा रोल ठरणार आहे. आजवर मी नायिका आणि खलनायिकेची भूमिका वठवली. या भूमिकांसाठी प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मला मिळाले. पहिल्यांदाच मी मुलांच्या शोमध्ये काम करत आहे. अशी भूमिका साकारण्याची ब-याच दिवसांची माझी इच्छा होती."
यापूर्वी आश्का छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'धरती का वीर पुत्र...महाराणा प्रताप' या मालिकेत महाराणी धीर बाई भटियानीच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या या पात्राला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती. भयंकर परीच्या भूमिकेविषयी आश्काने सांगितले, "शोमध्ये माझी ड्रॅमॅटिक एन्ट्री होणार असून प्रेक्षकांना माझा नवा अवतार भावेल, अशी आशा करते."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आश्काची काही निवडक छायाचित्रे...