आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : ही प्रसिद्ध TV अॅक्ट्रेस झाली 35 वर्षांची, भेटा तिच्या रिअल लाइफ नव-याला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नावाजलेली टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी हिचा आज 35 वा वाढदिवस आहे. 14 एप्रिल 1981 रोजी अनिताचा जन्म झाला. अनिताला नताशा नावानेही ओळखले जाते. अनिताने आपल्या अभिनय मॉडेलिंग क्षेत्रातून केली. एव्हर यूथ, सनसिल्क, बोरोप्लससह अनेक नामांकित ब्रॅण्ड्साठी तिने मॉडेलिंग केले. मॉडेलिंगमध्ये यशस्वी ठरल्यानंतर तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला.
एकता कपूरने दिला पहिला मोठा ब्रेक...
अनिताने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात बालजी टेलिफिल्म्सच्या 'कभी सौतन कभी सहेली' या मालिकेद्वारे केली होती. मात्र तिला खरी लोकप्रियता 'काव्यांजली' या मालिकेतील अंजली नंदा या भूमिकेने मिळवून दिली. 'कयामत', 'कसम से', 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'क्या दिल में है', 'कहानी हमारे महाभारत की', 'अनहोनियां का अंधेरा'सह अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे. सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत अनिता 'शगून' हे पात्र साकारत आहे.
सिनेमातही सोडली छाप...
अनिताने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड सिनेमांत तिने अभिनय केला आहे. अनिता बिझनेसमनसोबत लग्नगाठीत अडकली आहे. आज तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या लग्नाची खास गोष्ट आणि लग्नसोहळ्याची झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कसा रंगला होता अनिताचा लग्नसोहळा आणि कुणाची केलीये तिने जोडीदाराच्या रुपात निवड...
बातम्या आणखी आहेत...