आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : \'ये है मोहब्बतें\'च्या \'शगुन\'चा हा आहे रिअल लाइफ पती, दोन वर्षांपूर्वी अडकली लग्नगाठीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री अनिता हसनंदानीची लग्नातील छायाचित्रे)

नावाजलेली टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी हिचा आज 34 वा वाढदिवस आहे. 14 एप्रिल 1981 रोजी अनिताचा जन्म झाला. अनिताला नताशा नावानेही ओळखले जाते. अनिताने आपल्या अभिनय मॉडेलिंग क्षेत्रातून केली. एव्हर यूथ, सनसिल्क, बोरोप्लससह अनेक नामांकित ब्रॅण्ड्साठी तिने मॉडेलिंग केले.
मॉडेलिंगमध्ये यशस्वी ठरल्यानंतर तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला. अनिताने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात बालजी टेलिफिल्म्सच्या 'कभी सौतन कभी सहेली' या मालिकेद्वारे केली होती. मात्र तिला खरी लोकप्रियता 'काव्यांजली' या मालिकेतील अंजली नंदा या भूमिकेने मिळवून दिली. 'कयामत', 'कसम से', 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'क्या दिल में है', 'कहानी हमारे महाभारत की', 'अनहोनियां का अंधेरा'सह अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे. सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत अनिता 'शगून' हे पात्र साकारत आहे.
अनिताने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड सिनेमांत तिने अभिनय केला आहे.
बिझनेसमनसोबत अडकली लग्नगाठीत
बिझनेसमन रोहित रेड्डीसोबत अनिताचे लग्न झाले आहे. 14 ऑक्टोबर 2013 रोजी दाक्षिणात्य पद्धतीने अनिता रोहितसोबत लग्नगाठीत अडकली. गोव्यात त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडला. लग्नात पारंपरिक रुपात अनिता खूप सुंदर दिसली होती. अनिताची जवळची मैत्रीण आणि निर्माती एकता कपूर तिच्या लग्नात हजर होती. याशिवाय छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रिटी अनिताच्या लग्नात उपस्थित होते. गोव्यात तीन दिवस चाललेल्या या लग्नसोहळ्यात करणवीर बोहरा, श्वेता साळवे, मेघना नायडू, अंजना सुखानीसह बरेच सेलेब्स आले होते. अनिता आणि रोहितची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. तीन ते चार वर्षे डेटिंग केल्यानंतर 2013 मध्ये हे दोघे लग्नगाठीत अडकले.
आज अनिताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा कसा रंगला होता अनिता-रोहितचा लग्नसोहळा...