आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अॅक्‍ट्रेसला देहव्यापाराच्या आरोपात अटक, 15 हजारांमध्ये झाला होता सौदा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई पोलिसांनी सोमवारी (3 ऑगस्ट) रात्री देहव्यापाराच्या आरोपाखाली एक 27 वर्षीय टीव्ही अभिनेत्री आणि तिच्या एजेंटला अटक केली आहे. दोघांना मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखाने शबरी नावाच्या हॉटेलमधून अटक केली.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी ही अभिनेत्री देहव्यापारात सहभागी असल्याची माहिती आली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला रंगेहात पकडण्याची योजना तयार केली. एका पोलिस कर्मचा-याने बनावट ग्राहक बनवून अभिनेत्रीचा एजेंट राज उपाध्यायशी संपर्क साधला.
एजेंटने बनावट ग्राहक बनवून आलेल्या पोलिसाला अनेक छायाचित्रे दाखवली, त्यानंतर त्याने या अभिनेत्रीचा फोटो निवडला. दोघांमध्ये 15 हजांरात सौदा झाला. एजेंटने फोन केल्यानंतर ती अभिनेत्री हॉटेलमध्ये पैसे घेण्यासाठी पोहोचली तेव्हा दोघांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना अंबोली पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
अंबोली पोलिस ठाण्याच्या एका पोलिस अधिका-यांच्या सांगण्यानुसार, राज उपाध्यायला देहव्यापार प्रतिबंध कायदा (पीआयटीए) अंतर्गत अटक करण्यात आली, अभिनेत्रीला महिला पुनर्वास केंद्रात पाठवण्यात आले. या प्रकरणात पोलिस आणखी तपास घेत आहेत.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, सुरुवातीला तपास केल्यानंतर माहित झाले, की संघर्ष करणा-या अनेक अभिनेत्री राज उपाध्यायच्या संपर्कात होत्या. पोलिसांना शंका आहे, की त्यामधील अनेकींचा राज उपाध्याय देहव्यापारासाठी वापर करत होता.
यापूर्वीसुध्दा अनेक अभिनेत्रींचा देहव्यापारमध्ये सामावेश असल्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी दक्षिण अभिनेत्री श्वेता बसुचे सेक्स स्कँडल प्रकरण उघडकिस पडले होते.