आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववधूच्या रुपात अवतरली \'ये हैं मोहब्बतें\'ची गॉर्जिअस इशिता, जाणून घ्या कुठे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लेटेस्ट फोटोशूटमधील दिव्यांकाची झलक)

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत इशिता भल्ला हे पात्र वठवणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचे नववधूच्या रुपातले एक छायाचित्र समोर आले आहे. हे छायाचित्र बघून दिव्यांकाने लग्न केले की काय, असा प्रश्न साहजिकच तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला असेल ना. ती नववधूच्या रुपात अवतरली हे खरे आहे, मात्र शरद मल्होत्रासोबत ब्रेकअप झाल्यापासून खासगी आयुष्यात अद्याप ती सिंगलच आहे.
दिव्यांकाने नववधूचे रुप एका खास फोटोशूटसाठी घेतले आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तसे पाहता, यापूर्वीही दिव्यांकाने अनेकदा फोटोशूट केले आहे. मात्र या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.
वरील छायाचित्र हे दिव्यांकाच्या लेटेस्ट फोटोशूटमधील आहे. मात्र यासोबतच आम्ही तुम्हाला तिच्या मागील काही फोटोशूटचीसुद्धा झलक दाखवत आहोत. चला तर मग तुम्हीच ठरवा, ती या फोटोशूटमध्ये अधिक सुंदर दिसतेय, की यापूर्वीच्या फोटोशूटमधील तिचा अंदाज अधिक ग्लॅमरस होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, छोट्या पडद्यावरचा फ्रेश आणि एनरजेटिक फेस असलेल्या दिव्यांकाचे फोटोशूट...