आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे दिव्यांकाचे घर, येथेच झाले होते विवाहाचे विधी, अजूनही जपल्या आहेत आठवणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यंका त्रिपाठीच्या मेहंदीचा कार्यक्रम ज्याठिकाणी झाला होता, ती जागा अजूनही तशीच जपली आहे. - Divya Marathi
दिव्यंका त्रिपाठीच्या मेहंदीचा कार्यक्रम ज्याठिकाणी झाला होता, ती जागा अजूनही तशीच जपली आहे.
भोपाळ - टीव्ही अॅक्ट्रेस दिव्यांका त्रिपाठीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आज (८ जुलै) साजरा करण्यात येत आहे. दिव्यांका आणि विवेक दाहियाच्या लग्नाचे सर्व विधी भोपाळमधील कान्हा फन सिटी आणि घरी झाले होते. त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला दिव्यांकाचे लग्न झालेले भोपाळचे घर दाखवणार आहोत. भोपाळच्या घरी दिव्यांकाच्या लग्नाचे काही विधी आणि कार्यक्रम झाले होते. त्या घरी दिव्यांकाच्या आई वडिलांनी आजही त्या आठवणी जपल्या आहेत. 

अशा जपल्या आठवणी.. 
- भोपाळच्या चुना भट्टीमध्ये दिव्यांकाचे घर आहे. याचठिकाणी तिच्या लग्नाचे विधी झाले होते. 
- ज्याठिकाणी दिव्यांकाला हळद आणि मेंदी लावण्यात आली होती त्या ठिकाणासह मंडप आजही तसाच ठेवला आहे. 
- दिव्यांकाच्या लग्नाच्या वेळी तिचे घर आदिवासी थीमवर सजवण्यात आले होते. 
- आजही त्याथीमनुसार तयार केलेल्या काही बाबी दिव्यांकाचे वडील नरेंद्र आणि आई नीलम त्रिपाठी यांनी जपल्या आहेत. 

या सिरियद्वारे टीव्हीवर केले पदार्पण 
- दिव्यांकाच्या करिअरची सुरुवात 2004 पासून झीटीव्हीच्या 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार' द्वारे झाली होती. 
- दिव्यांका, मिस भोपाळचा किताब जिंकलेली आहे. 
- 'बनू मै तेरी दुल्हन' मालिकेद्वारे तिने टीव्हीवर पदार्पण केले होते. त्यानंतर आतापर्यंत तिने अनेक सिरियल केल्या आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, भोपाळमधील दिव्यांकाच्या घराचे फोटो.. याच घरात तिचे बालपण गेले...
बातम्या आणखी आहेत...