आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या TV अक्ट्रेसला दिल्लीला जायची वाटते भिती, कारण वाचून व्हाल आश्चर्यचकित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगढ- 'मी खूप भूकेली आणि लालची आहे. त्यामुळे मी नेहमीच अशा भूमिकांच्या शोधात होते, जे पूर्वी केलेल्यांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यातून माझी वेगळी ओळख निर्माण व्हावी. तशा भूमिकांसाठी मला दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागली तरी चालेल.' असे मॉडेल हुनर हॅलीचे म्हणणे आहे. ती चंदीगढमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आली होती.
दिल्ली आहे तिच्यासाठी अनलकी...
- हुनरने सांगितले, की टीव्ही शोचे शूटिंग तिला वारंवार दिल्लीला घेऊ जाते. परंतु तिला तिथे जाण्याची इच्छा नाहीये.
- '12/24 करोल बाग' या टीव्ही शोचे शूटिंग दिल्लीमध्ये झाले होते. त्यादरम्यान तिच्या वडिलांचे निधन झाले होते.
- ती शूटिंगमध्ये इतकी व्यस्त होती, की वडिलांच्या अंत्यसंस्कारात जाऊ शकली नव्हती.
- आणखी एका तिला शोनिमित्त दिल्लीला जावे लागले आणि त्यावेळी तिच्या आजोबांचे निधन झाले. यावेळीसुध्दा ती आजोबांच्या अंत्यसंस्कारात पोहोचू शकली नव्हती.
- त्यामुळे हुनर दिल्लीला अनलकी मानते. हुनरचे म्हणणे आहे, की ती जेव्हा कधी दिल्लीला गेली तेव्हा काही ना काही ट्रॅजेडी झाली.
कोण आहे ही अभिनेत्री...?
- हुनरचा जन्म 9 सप्टेंबर 1989ला दिल्लीमध्ये झाला.
- 'छल शाह और मात'मधील आदितीच्या भूमिकेसाठी तिला ओळखले जाते.
- ती सध्या लाइफ ओकेच्या 'एक बूंद इश्क' मालिकेत नंदिनीची भूमिका साकारत आहे.
- तिच्या करिअरची सुरुवात 2007मध्ये 'कहानी घर घर की' मालिकेच्या माध्यमातून झाली होती.
- 'जी ले जरा' आणि 'ससुराल गेंदा फिल' तिने लोकप्रिय टीव्ही शो आहेत.
मी आहे 'ऑड वन आऊट'
हुनरच्या सांगण्यानुसार, टीव्ही इंडस्ट्रीत करिअर करणे तिच्या खूप संघर्षपूर्ण आहे. कारण ती गर्दी चालू शकत नाही. म्हणून ती स्वत: 'ऑड वन आऊट' म्हणते. हुनरने सांगितले, की ती कामाशी काम ठेवते. म्हणून तिला पसंत करणारे कमी आणि तिरस्कार करणारे लोक जास्त आहेत. परंतु तिला याचा काहीच फरक पडत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हुनरचे ग्लॅमरस PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...