आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Actress Indu Verma Gets Three year Jail In 1996 Forgery Case

टीव्ही इंडस्ट्रीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीला तीन वर्षांचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः इंदू वर्मा - Divya Marathi
फाइल फोटोः इंदू वर्मा
नवी दिल्ली : 'एक हजारों में मेरी बहना है', 'मैं तेरी परछाई हूँ', 'यह प्यार ना होगा कम' या हिंदी मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री इंदू वर्मा हिला तीन वर्षांच्या सशक्त तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तब्बल 20 वर्षानंतर तिला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
42 वर्षीय इंदू वर्माने शिवानी अरोरा नावाने ‘थॉमस कूक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी संबंधित बनावट चेकद्वारे, एका दुकानातून 6 सप्टेंबर 1996 आणि 3 ऑक्टोबर 1996 रोजी सुमारे 17.50 लाख रुपयांचे दागिने खरेदी केले होते. दोषी इंदू वर्माने मालकाची 17.50 लाख रुपयांची फसवणूकही केली. त्यामुळे ती दया दाखवण्यासाठी लायक नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. तब्बल 20 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे.
न्यायाधीश लवलीन यांनी फसवणूक, कट रचणे, तोतयेगिरी आणि चेकची अफरातफर करणे या आरोपांअंतर्गत इंदू वर्माला दोषी ठरवले. तसेच थॉमक कूक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 20 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

पुढे वाचा, इंदूसाठी दिलासा देणारी घडलेली गोष्टी...