आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेता अमित टंडनच्या बहिणीच्या लग्नासाठी न्यूयॉर्कला पोहोचली '...महादेव'मधील सती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता अमित टंडनच्या बहिणीच्या लग्नात अभिनेत्री मौनी रॉय)
मुंबईः छोट्या पडद्यावर गाजलेल्या 'देवों के देव...महादेव' या मालिकेत सतीची भूमिका वठवणारी अभिनेत्री मौनी रॉय अलीकडेच न्यूयॉर्क येथे पोहोचली होती. येथे ती अभिनेता अमित टंडनच्या बहिणीच्या लग्नात सहभागी झाली होती. शनिवारी आणि रविवारी लग्नाच्या विधी पूर्ण झाल्या.
अमित टंडन सध्या 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत सुब्रमणियम बालचंद्रनच्या भूमिकेत झळकत आहे. बहिणीच्या लग्नासाठी तो खास न्यूयॉर्क येथे आला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी डॉक्टर रुबी टंडन आणि मुलगी जियानासुद्धा आल्या होत्या.
अमित आणि मौनी यांनी या लग्नाची काही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केली आहेत. पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही ही छायाचित्रे बघू शकता...