आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo: सेक्शुअल असॉल्टवर बोलली अॅक्ट्रेस, टीचरचा हात माझ्या इनरवेअरमध्ये होता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुनमुन दत्ता - Divya Marathi
मुनमुन दत्ता
मुंबई -  टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील बबिताजी अर्थात अॅक्ट्रेस मुनमुन दत्ता देखील #MeToo कॅम्पेनसोबत जोडली गेली आहे. मुनमुनने सोशल मीडियावर तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची आपबीती सांगितली आहे. 
 
मुनमुन म्हणाली, 'मी असे काही लिहित आहे, ज्यामुळे माझे डोळे डबडबले आहेत. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत. आमच्या शेजारी राहाणाऱ्या अंकलला मी फार घाबरत होते. संधी मिळताच ते मला करकचून मिठी मारायचे आणि धमकावत होते की मी हे कोणाला सांगायचे नाही.'
शिक्षकाचा हात माझ्या इनरवेअरमध्ये होता... 
हॉलिवूड सेलिब्रिटी एलिजा मिलानो हिने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाला वाचा फोडल्यानंतर जगभरातील महिला #MeToo हॅशटॅगने सोशल मीडियावर आपल्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल खुलासा करत आहेत. 
- बबिताजी अर्थात मुनमुन दत्ता हिने तिच्यासोबत शिक्षकानेच कसे अभद्र कृत्य केले होते याचा खुलासा केला आहे. 
- 'माझ्या ट्यूशन टीचरने तर माझ्या इनरवेअरमध्ये हात टाकला होता. एवढेच नाही तर आमचा एक शिक्षक होता, ज्याला मी राखी बांधत होते. तो क्लासमध्ये मुलींच्या ब्रा ओढायचा आणि त्यांच्या ब्रेस्टवर हाताने मारत होता. हे तुमच्यासोबत यामुळे होत असते, कारण तुम्ही एवढ्या छोट्या आणि घाबरलेल्या असतात, ज्यामुळे त्यांना वाटते की तुम्ही काहीच करू शकत नाही. याविरोधात बोलू शकत नाही. आवाज उठवू शकत नाही. या प्रकाराने एवढ्या घाबरलेल्या असतात की तुमचा गळा सुखलेला असतो. तुम्ही स्वतःच्या पॅरेंट्सलाही हे कसे सांगावे, की सांगू नये फेऱ्यात अडकलेल्या असतात.'
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आणखी काय लिहिले अॅक्ट्रेसने...
बातम्या आणखी आहेत...