Home »TV Guide» TV Actress Neha Laxmi Said I Had Also Increased The Weight

या अॅक्ट्रेसने वाढवले होते 12 किलो वजन, सांगितल्या वेटबद्दलच्या इंट्रेस्टिंग कथा

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 00:11 AM IST

  • नेहा लक्ष्मी अय्यर.

मुंबई/ इंदूर- बॉलिवूडमध्ये रोलसाठी वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे हे आता सरावाचे झाले आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्येही ही पद्धत आता रुढ होत चालली आहे. स्क्रिप्टची डिमांड आणि कॅरेक्टरनुसार स्वतःला दाखवण्यासाठी असे केले जात आहे. हे सांगत आहे अॅक्ट्रेस नेहा लक्ष्मी अय्यर. नेहा एका कार्यक्रमानिमित्त नुकतीच इंदूरला आली होती. यावेळी तिने टीव्ही इंडस्ट्रीतील तिचे अनुभव DivyaMarathi.Com सोबत शेअर केले.

नेहा म्हणाली, छोट्या पडद्यावरील कलाकारही आता मेथर अॅक्टिंग करत आहेत. ज्या प्रमाणे हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अॅक्टर भूमिकेप्रमाणे बॉडी ट्रांसफॉर्मेशन करतात, त्याच प्रमाणे टीव्ही अॅक्टर्स आता कॅरेक्टरनुसार वजन कमी जास्त करत आहेत, लुक्समध्ये चेंज करण्याला प्राधान्य देत आहे.


नेहा म्हणाली, मी देखील माझ्या भूमिकेची मागणी असल्यामुळे 12 किलो वजन वाढवले होते. एका अॅक्ट्रेसला करिअरच्या सुरुवातीला 12-13 किलो वजन वाढवणे मोठे रिस्की आहे. तुम्ही वजन वाढवून अॅक्ट्रेस होऊ शकता मात्र हिरोईन नाही, हे वास्तव देखील नेहाने सांगितले.
नेहा म्हणाली, लोकांच्या नजरेत हिरोईनची प्रतिमा पक्की झालेली आहे. त्यांच्या कल्पनेतील हिरोईन ही दुबली-पतली, नाजूक अशीच आहे. रिस्क असतानाही मी वजन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे मुख्य कारण टीव्ही इंडस्ट्रीत वाढलेली स्पर्धा. मी हे चॅलेंज स्वीकारले कारण ती स्क्रिप्टची मागणी होती.

सायकोलॉजीचे शिक्षण अॅक्टिंग करताना पडले उपयोगी
- नेहा म्हणाली, शो बिझनेसमध्ये वेट वाढवल्याने स्ट्रेस तर येणारच होता. तेव्हा मला माझे सायकोलॉजीचे शिक्षण उपयोगी पडले. मी सायकोलॉजीचेमध्ये ग्रॅज्यूएशन केले आहे. अॅक्टिंग करतानाही याचा फार उपयोग होतो.
- अॅक्टिंग करताना हलके-फुलके एक्सप्रेशन्स कसे कमाल करु शकतात हे समजण्यास सोपे झाले.
- अद्याप स्वतःमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचेही नेहाने प्रामाणिकपणे सांगितले. त्यासाठी अनुभव महत्त्वाचा ठरत असल्याचे ती म्हणाली.


'हम पांच'मध्ये दिसली होती नेहा
- 90च्या दशकामधील प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'हम पांच'मध्ये नेहा चाइल्ड आर्टिस्ट म्हणून झळकली होती.
- नेहा म्हणाली, मी सर्वप्रथम कॅमेरासमोर गेले ते 'बनेगी अपनी बात'या सीरियलच्या निमित्ताने. तेव्हा मी सहा वर्षांची होते. पालकांनी शिक्षणावर जोर दिला आणि मी देखील त्यांचे म्हणणे एकले. शिक्षण सोडून काहीही केले नाही.
- परीक्षेसाठी मी 'कृष्णा बेन खाकरावाला' हा शो सोडला होता.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, नेहाचे PHOTOS

Next Article

Recommended