आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या नेहाला निर्मात्यांची वॉर्निंग, म्हणाले- वजन कमी कर नाही तर मालिकेतून काढून टाकू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेत संजनाची व्यक्तिरेखा साकारणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेला या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. बातम्यांनुसार, निर्मात्यांनी नेहाला शोमधून रिप्लेस करणार असल्याचा इशारा दिला आहे. निर्मात्यांच्या मते, नेहाने तिचे वाढलेले वजन कमी करावे, अन्यथा ते तिला काढून दुस-या अभिनेत्रीला मालिकेत घेतील. 

नेहाचा या मालिकेसोबत आहे 6 महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट...
- नेहाचा निर्मात्यांसोबत 6 महिन्यांचा करारा शिल्लक आहे. निर्मात्यांनी नेहाला वॉर्निंग देताना करार पुढे वाढवणार नसल्याचे सांगितले आहे.  
- नेहा  दीर्घ काळापासून टीव्ही इंडस्ट्रीत अॅक्टिव आहे.  1990 साली 'हसरतें'द्वारे तिने डेब्यू केले होते.
- याशिवाय नेहा 'मीठी-मीठी बातें' (1998-99), 'भाग्यलक्ष्मी' (2011) या मराठी मालिकेत झळकली होती.

सिनेमांमध्ये अॅक्टिव आहे नेहा..
- नेहा टीव्ही इंडस्ट्रीसोबत मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत कार्यरत आहे. 1999 मध्ये तिने 'प्यार कोई खेल नहीं'द्वारे डेब्यू केले होते.
- 'दाग: द फायर'(1999), 'दीवाने'(2000), 'तुमसे अच्छा कौन है'(2002), 'देवदास'(2002), 'ड्रीम्स'(2005), 'स्वामी'(2007), 'असीमा'(2009), 'दिल तो बच्चा है जी'(2011) या सिनेमांमध्ये नेहा झळकली आहे. 
- 'दुसरी गोष्ट', 'प्रेमासाठी कमिंग सून', 'शर्यत', 'बाळकडू', 'नटसम्राट' हे अलीकडच्या काळात रिलीज झालेले तिचे मराठी सिनेमे आहेत.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, नेहाचे 4 फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...