आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'...महादेवा\'च्या पार्वतीने शेअर केला बिकीनी PHOTO, आल्या अश्लिल कमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'देवों के देव...महादेव' या लोकप्रिय शोमध्ये पार्वतीची भूमिका साकारणा-या पूजा बॅनर्जीने अलीकडेच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ती पिंक कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. फोटोसोबत तिने लिहिले, 'पुन्हा एकदा व्हॅकेशनवर जाण्याची ईच्छा आहे.' नुकताच शेअर केलेल्या पूजाला या फोटोवर आलेल्या नकारात्मक कमेंट्सचासुध्दा सामना करावा लागला आहे. परंतु तिने यावर काहीच प्रतिक्रिया दिल्या नाहीत. त्यातील अनेक कमेंट्स तिने डिलीट केल्या आहेत. एका यूजरने पूजाला असेही म्हणाला, की पूजाने त्याची डर्टी कमेंट डिलीट केली. परंतु तिने इतर लोकांच्या कमेंट्ससुध्दा डिलीट करायला हव्या होत्या.
सध्या कृष्णाच्या शोमध्ये दिसतेय पूजा...
पूजा बॅनर्जी सध्या कृष्णा अभिषेकच्या 'कॉमेडी नाइट्स बचाओ' या कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. ती मुंबईत राहते आणि अभिनयासोबतच मॉडेलिंगसुध्दा करत आहे. तिला टीव्हीवर 'तुझ संग प्रीत लगाई सजना' मालिकेतून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 'देवो के देव महादेव' शोमधून जास्त प्रसिध्द झाली.
टीव्हीवर पहिले पाऊल...
पूजाला ओळख 'तुझ संग प्रीत लगाई सजना' आणि 'देवो के देवो महादेव'मधून मिळाली असली तरी तिने टीव्हीवर पहिले पाऊल एकता कपूरच्या 'कहानी हमारे महाभारत की' या पौराणिक शो मधून ठेवले होते. या मालिकेत ती कृष्णाची प्रेयसी राधाच्या रुपात दिसली होती. मात्र, टीव्हीवर या शोला लोकप्रियता मिळाली नाही आणि चार महिन्यातच डबाबंद झाली. ती इमॅजिन टीव्हीच्या 'सर्वगुण संपन्न' शोमध्ये झळकली आहे.
फिल्म करिअर...
पूजाला हिंदीमध्ये केवळ टीव्हीवर प्रसिध्दी मिळाली. परंतु ती बंगाली सिनेमांतून मोठ्या पडद्यावर झळकली आहे. 'माचो मस्ताना' (2012), 'चॅलेंज-2' (2013), 'लवरिया' (2013) आणि 'तीन पत्ती' (2014) या बंगाली सिनेमांत तिने अभिनय केला आहे. पूजाने एका तेलगू सिनेमातसुध्दा काम केले आहे. हिंदीमध्ये लिएंडर पेसच्या अपोझिट 'राजधानी एक्स्प्रेस' (2013) सिनेमातसुध्दा पूजा दिसली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूजाचे इंस्टाग्रामवरील इतर PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...