आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांतच झाला होता या TV अॅक्ट्रेसचा घटस्फोट, आता DJ सोबत थाटला दुसरा संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'सूर्यपुत्र कर्ण'(2015-16) या मालिकेत झळकलेली अभिनेत्री प्रिया बठीजाने 22 मे रोजी कवलजीत सलूजासोबत दुसरे लग्न केले आहे. दोघांचे लग्न रायपूर येथील एका गुरुद्वारामध्ये पंजाबी पद्धतीने झाले. या लग्नात दोघांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटोज शेअर करुन लग्नाची बातमी दिली. फोटोजमध्ये प्रिया पिंक अँड यलो कलरच्या लहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे. 
 
टीव्ही अॅक्टरसोबत झाले होते पहिले लग्न...
- प्रियाचे पहिले लग्न 'कस्तूरी'(2007) फेम टीव्ही अॅक्टर जतिन शाहसोबत झाले होतेय
-  2009 साली दोघांचे लग्न झाले होते. मात्र काही कारणास्तव 2011 मध्ये दोघे विभक्त झाले.
- आता प्रियाने कवलजीत सलूजासोबत दुसरे लग्न केले. डिसेंबर 2015 मध्ये जतिननेसुद्धा अॅक्ट्रेस अपर्णा सिंहसोबत दुसरे लग्न केले.

कोण आहे कवलजीत?
- प्रियाचे पती कवलजीत टीव्ही इंडस्ट्रीतून नसून ते म्युझिक अरेंजर आणि डीजे आहेत.
- काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपुडा झाला होता.

असे झाले लग्न
- लग्नाविषयी प्रिया सांगते, "एका कॉमन फ्रेंडने मला सांगितले होते, की कवल पहिल्याच भेटीत माझ्या प्रेमात पडले होते."
- "कवलने त्याच्या कुटुंबीयांना माझ्याबद्दल सांगितले. नंतर आमच्या दोघांच्याही कुटुंबीयांची भेट झाली. 13 फेब्रुवारी रोजी आमचा रोका झाला आणि आता आम्ही लग्न केले आहे."
- "मी कधीही अरेंज्ड मॅरेजविषयी विचार केला नव्हता. कवलला मी ओळखतसुद्धा नव्हते. पण त्याला भेटल्यानंतर मी त्याच्या प्रेमात पडले."

पुढील स्लाईड्सवर बघा, लग्नाचे 8 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...