(पती व्हॅलेंटिनो फेलमनसोबत डान्स करताना पूर्वी जोशी)
मुंबई- प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री पूर्वी जोशीने 6 डिसेंबर 2014 रोजी बॉयफ्रेंड व्हॅलेंटिनो फेलमनसोबत लग्न केले. तिचे लग्न धूमधडाक्यात पार पडले. यांच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन रविवारी (7 डिसेंबर) मुंबईमध्ये आयोजित करण्यात आले होते.
पूर्वीच्या रिसेप्शनमध्ये बी-टाऊनचे अनेक सेलेब्स सामील झाले होते. सामील होणा-यांमध्ये जास्तित जास्त टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स होते. रिसेप्शनमध्ये सोहेल खानसुध्दा पोहोचला होता. सोबतच, मानसी जोशी रॉय, रोहित रॉय, मेघना नायडू,
अर्चना पूरण सिंह, प्रेम चोप्रा, एजाज खान, विनय पाठक, कीकू शारदा, शरमन जोशी, भारती, सुनील ग्रोवर, रणवीर शौरीसह अनेत सेलेब्स सामील झाले होते.
रिसेप्शनदरम्यान पूर्वी आणि व्हॅलेंटिनो यांनी शानदार डान्स केला. तसेच, इतर सेलेब्ससुध्दा एन्जॉय करताना दिसले. पूर्वी प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री सरिता जोशीची मुलगी आणि केतकी देवची बहीण आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूर्वी-व्हॅलेंटिनोच्या लग्नाची आणि रिसेप्शनची छायाचित्रे...