आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • TV Actress Rehana Malhotra In Live in ralation With Most Wanted

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोस्ट वॉंडेटसोबत गेल्या 6 महिन्यांपासून Live-in मध्ये होती ही काश्मिरी अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- छत्तीसगडची राजधानी राजपूरमधील एमसीएक्स ट्रेडर आणि गेल्या चार वर्षांपासून मोस्ट वॉंटेड नितीन चोपडा यांना मुंबईच्या पॉश जुहू परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पकडले तेव्हा 'जमाई राजा' टीव्ही सिरिअलची अॅक्ट्रेस रेहाना मल्होत्रा त्यांच्यासोबत होती. श्रीनगरमध्ये जन्म झालेल्या रेहानाने फेयर क्रीमचीही अॅड केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून रेहानासोबत लिव-इनमध्ये असल्याचे नितीनने कबुल केले आहे.
कोण आहे रेहाना मल्होत्रा
रेहानाचा जन्म काश्मिरी पंडीत कुटुंबात झाला. भारतातील अनेक शहरांमध्ये ती राहिली आहे. तिला बालपणापासून अॅक्टिंगचा छंद होता. तिने लहानपणापासूनच डान्स ट्रेनिंग घेण्यास सुरवात केली होती. काही वेळा गणिताचा तास बुडवून ती डान्स ट्रेनिंगला अतिरिक्त वेळ देत होती. एकचा वडीलांनी तिला असे करताना पकडले होते. त्यावर त्यांनी तिची चांगलीच कानउघाडणी केली होती. पण नंतर त्यांनी तिला डान्ससाठी परवानगी दिली.
शाळेय दिवसांमध्ये तिने क्लासिकल डान्समध्ये अनेक पारितोषिके जिंकली. शाळा आणि कॉलेजमधील ड्रामा ग्रुपमध्ये ती सक्रीय होती. तिने बंगळुरुमधील ज्योती निवास कॉलेजमधून इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये पदवी पूर्ण केली आहे. मिस हिरो होंडा कॉन्टेस्टही ती जिंकली आहे.
शेन फाल्गुनी पीकॉक, रॉकी एस, बबीता मल्कानी या सारख्या नावाजलेल्या डिझायनरसोबत तिने काम केले आहे. याशिवाय फेयर अॅंड लव्हली, अकबर ट्रॅव्हल्स, मदर ऑप्टिकल आणि बनाना राईस या अॅडमध्ये झळकली आहे. बॉलिवूड आणि तमिळ चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. जमाई जारा या सिरिअलनंतर ती घराघरांत पोहोचली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अॅक्ट्रेस रेहाना मल्होत्राच्या दिवखेचक अदा....