आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: TVवरील ही 'छोटी बहू' रिअल लाइफमध्ये आहे खूपच ग्लॅमरस, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलाइक)
मुंबई: टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलाइक टीव्ही इंडस्ट्रीच्या प्रसिध्द चेह-यापैकी एक आहे. 'जीनी और जूजू' आणि 'छोटी बहू' या मालिकांमधून लोकप्रियता मिळवणारी रुबीना आज 27 वर्षांची झाली आहे. रुबीना जेवढी ऑनस्क्रिन ग्लॅमरस दिसते तेवढीच रिअल लाइफमध्येसुध्दा आहे.
26 ऑगस्ट 1987 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये जन्मलेली रुबीना बालपणापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. रुबीनाने शिक्षण पूर्णही झाले नव्हते तोच तिला 'छोटी बहू' या मालिकेची ऑफर मिळाली. रुबीनाने ही ऑफर स्वीकार करू नये अशी तिच्या आई-वडीलांची इच्छा होती. परंतु रुबीनाने आई- वडीलांचे म्हणणे मानले नाही आणि अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवला. सोबतच तिने शिक्षणसुध्दा चालू ठेवले.
'छोटी बहू'मधून केली करिअरला सुरुवात
2008मध्ये रुबीनाने झीटीव्हीवर प्रसारित होणा-या 'छोटी बहू' या मालिकेतून करिअरला सुरुवात केली. रुबीनाने या मलिकेत राधिकाचे पात्र साकारले होते. या पात्रासाठी रुबीनाला झी रिश्ते अवॉर्डसुध्दा मिळाला होता. त्यानंतर रुबीना 'सास बिन ससुराल', 'नचले विद सरोज खान', 'पुर्नविवाह- एक नई उम्मीद', 'देवो के देव महादेव' आणि 'जीनी और जूजू'मधून आपल्या दमदार अभिनयाने तिने चांगली लोकप्रिता मिळवली आहे. 'जीनी और जूजू'मध्ये अली असगरसह तिला बरीच प्रशंसा आणि प्रसिध्दी मिळाली आहे. या मालिकेत रुबीना परीचे पात्र साकारत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रुबीना दिलाइकची काही खासगी छायाचित्रे...