आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या बातम्यांवर बोलली सारा खान, 'भांगात भरलेल्या कुकुंवाचा चुकीचा अर्थ काढला'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अलीकडेच बातमी आली होती, की टीव्ही अभिनेत्री सारा खानने बॉयफ्रेंड ऋषभ टंडनने लग्न केले आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये ती ऋषभसोबत होती आणि तिच्या भांगात कुंकु भरलेले होते. परंतु साराच्या सांगण्यानुसार, तिच्या लग्नाच्या बातम्या केवळ अफवा आहेत. तिच्या भांगात भरलेल्या कुंकुवाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे.
divyamarathi.comसोबत बातचीत करत असताना तिने सांगितले, 'मी फोटो खाली लिहिले आहे, की लवकरच लग्न करणार आहे. त्या दिवशी मी एक फोटोशूट करून परतले होते. तिकडून आल्यानंतर मी ड्रेस बदलला, परंतु कुंकु काढायचे माझ्या लक्षातच राहिले नाही. मी फोटोशूटसाठी कुंकु भांगात भरले होते. मी आणि ऋषभने एका फोटो क्लिक केला आणि शेअर केला. या फोटोला लोकांनी चुकीच्या दृष्टीकोनाने पाहिले. मला माझ्या लग्नाच्या बातम्यांविषयी माहिती झाले तेव्हा मी दुबईमध्ये होते. हे ऐकून मला धक्काच बसला.'
सारा पुढे सांगते, 'लग्नाच्या अफवा माझा पाठलाग सोडत नाहीये. मला माहित नाही, की माझ्यासोबत हे काय घडतय. इतकेच सांगू शकते, की अद्याप माझे लग्न झाले नाहीये, परंतु लवकरच करणार आहे.'
सारा पहिल्यांदाच आपल्या लव्हलाइफविषयी चर्चेत आली आहे असे नाहीये. ऋषभपूर्वी ती पारस छाबडाला डेट करत होती. एवढेच नव्हे 'बिग बॉस-4' या रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक अली मर्चेंटसोबत लग्न केल्यानेसुध्दा चर्चेत आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऋषब टंडनसोबतची सारा खानची छायाचित्रे...