आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Actress Saumya Tandon To Marry Her Best Friend!

Real Lifeमध्ये विवाहबध्द होणार \'भाभीजी\', बँकर बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: सौम्या टंडन आणि सौरभ देवेंद्र सिंह)
 
मुंबई- टीव्हीवर प्रसारित होणारा \'भाभीजी घर पर है\' या लोकप्रिय शोची अभिनेत्री सौम्या टंडन लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. सौम्या बॉयफ्रेंड सौरभ देवेंद्र सिंहसोबत लग्न करत आहे. तो पेशाने बँकर आहे. बातम्यांनुसार, दोघांची मैत्री कॉलेज दिवसांत झाली होती. कॉलेजच्या दिवसांपासून बेस्ट फ्रेंड झाले होते. ते एकमेकांना गेल्या 10 वर्षांपासून ओळखतात. इतकेच नव्हे तर अभिनयात करिअर करण्यासाठी सौरभने सौम्या पाठिंबा दिला होता. 
 
एका मुलाखतीत सौम्याने आपल्या रिलेशनशिपला स्वीकारले होते. आपल्या नात्यावियषी सांगताना ती म्हणाली, \'सौरभने मला माझ्या वडिलांच्या निधनानंतर सावरले. तो माझा मित्र, फिलॉस्फर आणि मार्गदर्शक आहे. लग्न केवळ एक औपचारिकता आहे. मी खूप आनंदी आहे, की तो माझ्या आयुष्यात आहे. यापूर्वी तो देशाबाहेर राहत होता, त्यामुळे आम्ही लाँग-डिस्टेन्स रिलेशनशिपमध्ये होतो. परंतु आता तो परत आला आहे आणि मुंबईमध्ये काम करत आहे. सध्या आम्ही दोघे कामात व्यस्त आहोत. परंतु वेळ मिळताच आम्ही आम्ही लग्न करणार आहोत.\'
 
2006मध्ये केला पहिली टीव्ही शो- 
सध्या टीव्हीवर अनिता भाभी नावामे ओळखली जाणारी सौम्याने पहिल्यांदा 2006मध्ये आलेल्या टीव्ही शोमध्ये काम केले होते. या शोचे नाव \'ऐसा देश है मेरा\' होते, त्यामध्ये सौम्याने रस्टी देओलचे पात्र साकारले होते. त्यानंतर ती, \'मेरी आवाज को मिल गई रोशनी\'मध्ये अभिनय करताना दिसली. होस्ट म्हणून ती शाहरुख खानच्या रिअॅलिटी शो \'जोर का झटका\'मध्ये झळकली होती. शिवाय, \'कॉमेडी सर्कस के तानसेन\', \'मल्लिका-ए-किचन ऑन एयर\' (2, 3, 4) आणि \'डान्स इंडिया डान्स\' (1, 2, 3)सारखे शोसुध्दा तिने होस्ट केले आहेत. 
 
\'जब वी मेट\'मध्ये बनली करीनाची बहीण- 
2007मध्ये सौम्याने दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या \'जब वी मेट\' सिनेमात करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तिने सिनेमात गीतच्या भूमिकेत दिसली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सौम्याच्या ग्लॅमरस अदा...