आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tv Actress Shikha Singh Will Tied Knot On 30th April

30 एप्रिलला या TV अॅक्ट्रेसचे होणार लग्न, 4 वर्षांपासून पायटलला करतेय डेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिखा सिंह आणि करण शाह - Divya Marathi
शिखा सिंह आणि करण शाह
मुंबई: 'कुमकुम भाग्य' फेम शिखा सिंह 30 एप्रिलला लाँगटाइम बॉयफ्रेंड करण शाहसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. करण पायटल असून तो मागील चार वर्षांपासून डेट करतोय. 30 वर्षांच्या शिखाने इंस्टाग्रामवर करणसोबतचा एक फोटो शेअर करून लिहिले, 'Presenting to u the Groom #captkaranshah'
गुजराती पध्दतीने होणार लग्न...
सूत्रांच्या सांगण्यानुसार, शिखा आणि करण यांचे लग्न गुजराती पध्दतीने होणार आहे. काही महिन्यांपूर्वी शिखाला लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली होती, तिला अभिनेत्यासोबत नव्हे वेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीसोबत लग्न करायचे आहे. तिने सांगितले होते, 'करण खूप समजदार जोडीदार आहे. तो माझे काम समजू शकतो. कारण, तोसुध्दा एका क्षेत्रात काम करतोय. त्यामुळे त्याला माहितीये, की वर्किंग ऑवर्स किती इरेटिक असते. त्याने ते समजू घेतले. जोपर्यंत तुम्ही काम करताय, मला नाही वाटत, की कुणाला त्याची अडचण असते. असेच काहीसे येथेसुध्दा आहे.'
अनेक मालिकेत झळकली आहे शिखा...
'कुमकुम भाग्य'मध्ये आलिया मेहराची भूमिका साकारणा-या शिखाने या मालिकेशिवाय 'लेफ्ट राइट लेफ्ट', 'मेरी डोली तेरे अंगना', 'न आना इस देश लाडो', 'फुलवा', 'ससुराल सिमर का' आणि 'महाभारत' या शोमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शिखाचे करणसोबतचे PHOTOS...