आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'द्रौपदी\'पासून ते श्वेता तिवारीपर्यंत, या फेमस फॅशन मॅगझिनवर दिसला अॅक्ट्रेसेसचा हॉट अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 1988 मध्ये बी. आर. चोप्रांची गाजलेली मालिका 'महाभारत'मध्ये 'द्रौपदी'ची दमदार भूमिका साकरणारी रुपा गांगुली हिचा आज वाढदिवसू असून तिने वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 25 नोव्हेंबर 1966 रोजी कल्याण, कोलकाता येथे जन्मलेल्या रुपाने हिंदीसोबतच बंगाली टीव्ही आणि सिनेमात भरपूर काम केले आहे. अनेक मॅगझिन्ससाठी तिने फोटोशूटही केले आहे. असेच एक फोटोशूट (वरील छायाचित्रात) तिने यंग एजमध्ये शोटाइम या फॅशन मॅगझिनसाठी केले होते. यामध्ये तिचे मादक रुप दिसले होते. तीनदा केलाय आत्महत्येचा प्रयत्न...

'महाभारत' या मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणा-या रुपाचे खासगी आयुष्य अनेक चढउतारांचे राहिले.1992 साली मॅकेनिकल इंजिनिअर ध्रुब मुखर्जीसोबत तिचे लग्न झाले. मात्र वैवाहिक आयुष्यात तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या कारणामुळे ती आपल्या पतीपासून विभक्त झाली आणि काही वर्षांत घटस्फोट घेतला. खरं तर रुपाने आपल्या पतीसाठी अभिनयाला रामराम ठोकला होता आणि लग्नानंतर ती त्याच्याबरोबर कोलकत्याला स्थायिक झाली होती. ती लग्नानंतर हाऊसवाईफ झाली. मात्र तिला तिच्या दैनंदिन खर्चासाठी नव-याकडून पैसे मिळत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात खटके उडायचे. रोजच्या त्रासाला कंटाळून रुपाने तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
2006 मध्ये ध्रुब आणि रुपाचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीत रुपाने सांगितले होते, की ध्रुब तिच्या अॅक्ट्रेस स्टेटसमुळे इनसिक्युअर फिल करत होते. ध्रुब आणि रुपा यांचा एक मुलगा असून आकाश त्याचे नाव आहे. आकाशचा जन्म 1997 मध्ये झाला.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती रुपा..
पती ध्रुबपासून विभक्त झाल्यानंतर रुपाने तिच्यापेक्षा वयाने 13 वर्षांनी लहान असलेल्या गायक प्रेमी दिब्येंदुसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली. मात्र लवकरच दोघे वेगळे झाले. 'सच का सामना' रुपाने सांगितले, की 'महाभारत' या मालिकेत काम करत असताना, तिचे विवाहबाह्य संबंध होते.

अभिनेत्री होण्याचा नव्हता विचार...
1988 मध्ये रुपाचा अनिल कपूरसोबत 'साहिब' हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला होता. त्यानंतर ती मल्याळम सिनेमात दिसली होती. मात्र, रुपाला महाभारतातील 'द्रौपदी' या भूमिकेने प्रथित यश मिळवून दिले. 1988 साली दूरदर्शनवर सुरु झालेल्या 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत रुपा गांगुली द्रौपदीच्या भूमिकेत झळकली होती. बी.आर. चोप्रा यांच्या या मालिकेमुळे रुपा अचानक प्रसिद्धीझोतात आली होती. द्रौपदीच्या भूमिकेमुळे नाव, प्रसिद्धी, पैसा कमावणा-या रुपाला मात्र ती एक चांगली अभिनेत्री नसल्याचे वाटत होते. रुपाच्या मते, अभिनय कसा करावा, हे तिला ठाऊक नव्हते, मात्र प्रत्यक्षात ती द्रौपदीची भूमिका साकारत होती. शिवाय तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंतीची पावतीसुद्धा मिळत होती.
अनेक सिनेमांमध्ये झळकली आहे रुपा...
रुपा गांगुलीला टेलीवूडमधील अनेक मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. रुपा गांगुलीने सांगितले, की तिने अभिनेत्री होण्याचा विचार कधीच केला नव्हता. मात्र अपघाताने ती या क्षेत्रात आली. द्रौपदीची भूमिका मिळवण्यासाठी तिला बरेच कष्ट घ्यावे लागले होते. रुपा बॉलिवूडमध्ये 'साहेब' (1985), 'एक दिन अचानक' (1989), 'प्यार के देवता' (1990), 'बहार आने तक' (1990), 'सौगंध' (1991), 'निश्चय' (1992) आणि 'बर्फी' (2012) या सिनेमांमध्ये झळकली आहे. रुपा गांगुली एक चांगली गायिकासुद्धा आहे. तिला पार्श्वगायनासाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे.
शोटाइम या मॅगझिनविषयी बोलायचे झाल्यास, या मॅगझिनसाठी अनेक अभिनेत्रींनी हॉट फोटोशूट केले आहे. यामध्ये श्वेता तिवारीपासून चंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिकच्या नावाचा समावेश आहे. पुढील स्लाईड्समध्ये बघा अॅक्ट्रेसेसचे हे हॉट PHOTOSHOOT....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...