आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसिद्ध चॅनलच्या टीव्ही अँकरची आत्महत्या, वयाच्या 23 व्या वर्षी उचलले टोकाचे पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद : तेलगू म्युझिक टेलिव्हिजनवर अँकर म्हणून काम करणा-या 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. के. निरोशा असे या टीव्ही अँकरचे नाव असून ती जेमिनी म्युझिक वाहिनीवर अँकर म्हणून काम करायची. ही घटना सिकंदराबदमध्ये घडली आहे.
सिकंदराबादच्या पीजी हॉस्टेलमध्ये 23 वर्षीय के. निरोशाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. के. निरोशाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आत्महत्येपूर्वी निरोशाने कॅनडामध्ये राहणाऱ्या तिच्या बॉयफ्रेण्डला व्हिडिओ कॉल केल्याचे समजते. त्यामुळे निरोशाच्या आत्महत्येमागील कारण बॉयफ्रेण्ड आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.
पोलिसांना तिच्या मृतदेहाशेजारी मोबाइल आढळला असून तो स्विचऑफ होता. बॉयफ्रेंडसोबत व्हिडिओ कॉल करण्याच्या काही मिनिटांपूर्वीच निरोशाने आपल्या आईवडिलांना फोन केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, के. निरोशाच्या फेसबुक पेजवरुन घेण्यात आलेली छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...