(नेहा कक्कड, उपासना सिंह आणि अनिल कपूर)
मुंबई: दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुध्दा इंडियन टेलिव्हिजन अॅकॅडमी अवॉर्ड्समध्ये ग्लॅमरचा तडका लागला. या अवॉर्डमध्ये रोनित रॉय, अशिष शर्मा, जिया माणिक, क्रिश्टल डिसूजा, निया शर्मा, फैजल खान, दिलीप जोशी, रवि दुबे, शरगुण मेहता, करण टॅकर, उपासना सिंह आणि स्मिता बंसलसारखे अनेक टेलिव्हिजन स्टार्स रेड कार्पेटवर दिसले. अनिल कपूरसह अनेक बॉलिवूड स्टार्सनेसुध्दा अवॉर्ड सेरेमनीमध्ये उपस्थिती लावली.
14वे ITA अवॉर्ड्समध्ये अनिल कपूर यांना त्यांच्या अॅक्शन थ्रिलर '24'साठी सन्मानित करण्यात आले. तसेच, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दिलीप जोशीला बेस्ट कॉमेडिअन म्हणून सन्मानित करण्यात आले.
Divyamarathi.comशी बातचीत करताना दिलीप जोशी म्हणाले, 'हा माझा दुसरा ITA अवॉर्ड आहे. मी प्रेक्षकांचे आभार मानतो, की त्यांनी मला इतके प्रेम दिले. मी किती आनंदी आहे, हे मला शब्दात सांगणे कठिण आहे.' या इव्हेंटला नकुल मेहता आणि रित्विक धंजानीने होस्ट केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 14व्या टेलिव्हिजन अवॉर्ड्समध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या टीव्ही स्टार्सची झलक...