आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा पडदा: महादेवाला मिळाली नवी पार्वती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लाइफ ओके चॅनलवरील ‘देवों के देव महादेव’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मात्र, काही दिवसांपासून या मालिकेतील ‘पार्वती’चे नखरे वाढल्याने तिला कैलास पर्वताच्या सेटवर अक्षरश: नोटीस पिरीयडवर ठेवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. नखरेल अभिनेत्री सोनारिका भादोरिया हिला बदलून पूजा बोस हिने पदार्पण केले आहे.


चित्रपटाच्या नट्यांनी स्पेशल ट्रीटमेंटसाठी नखरे केल्याची नेकदा चर्चा असते. मात्र यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या मालिकेतील नटीचे नखरे सहन करण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. 'महादेव' या मालिकेत पार्वतीच्या सालस भूमिकेत असलेली सोनारिका प्रत्यक्षात मात्र अनेक मागण्या करणारी उपद्रवी कलाकार होती, असा सेटवरील प्रत्येकाचा अनुभव होता. दिग्दर्शक आणि निर्माते दोघांनीही काही काळ तिचे नखरे सहन केले मात्र डोक्यावरून पाणी गेल्यानेच चॅनलने रिप्लेसमेंटचे अस्त्र उगारले आणि पूजा बोसचा नव्याने प्रवेश झाला. सोनारिकाने एक वर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवले आता पूजाला अर्थात्च मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. कमनीय बांधा, सुंदर हस-या चेह-याची आणि प्रेक्षकांना पार्वतीच्या रुपात प्रचंड आवडलेली सोनारिकाची सर नव्या पार्वतीला म्हणजेच पूजाला येते का ते येणा-या भागांत कळेल.