आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दयाबेन\'चे तन्ना, जोधाचे \'परी\', असे आहेत टीव्ही स्टार्सचे निकनेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये मूळ नाव: दिशा वाकाणी, निकनेम: तन्ना, डावीकडून, मूळ नाव: परिधी शर्मा, निकनेम: परी)
मुंबई- टीव्ही जगातील कलाकार दयाबेन, पिंकी बुआ, वीरा, ईशीता, सूरज आणि संध्या या नावांनी प्रसिध्द आहेत. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का, त्यांचे मूळ नाव काय आहेत. किंवा त्यांचे कुटुंबीय, मित्र-मैत्रीणी त्यांना कोणत्या नावाने बोलवतात. टीव्ही इंडस्ट्रीच्या काही कलाकारांने प्रेमाने वेगळ्या नावाने बोलवले जाते, त्याला आपण निकनेम म्हणतो.
अलीकडेच Divyamarathi.comने 'बिग बॉस' फेम सुकिर्ती कंडपालला तिच्या निकनेमविषयी विचारल्यानंतर तिने सांगितले, 'माझे मित्र-मैत्रीणी आणि कुटुंबीय 'सु' म्हणून बोलवतात.' सुकिर्ती मोठे नाव असले तरी ते ऐकायला छान वाटते, तरीदेखील लोक मला माझ्या नावाच्या शॉर्ट फॉर्मने बोलवतात. म्हणून बालपणापासून माझे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रीणी 'सु' बोलवतात.
तसेच, 'तारक मेहता का उल्टी चश्मा' फेम 'दयाबेन' अर्थातच दिशा वाकाणीला तिचे कुटुंबीय प्रेमाने 'तन्ना' म्हणतात. तसेच 'जोधा अकबर' फेम 'जोधा' अर्थातच परिधी शर्माला तिच्या जवळचे लोक 'परी' म्हणतात.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की निया शर्माचे मूळ नाव नेहा शर्मा आहे. तिला सुरुवातीपासूनच तिचे नाव छोटे आणि वेगळे ठेवायचे होते. म्हणून तिने आपले नाव बदलून 'निआ' ठेवले. 'एक नई पहचान'मध्ये झळकलेली क्रिस्टर डिसूजाला तिचे घरचे लोक 'किट्टु' म्हणून बोलावतात.
divyamarathi.com आज तुम्हाला टीव्ही स्टार्सच्या निकनेमविषयी सांगत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या टीव्ही स्टारचे कोणते निकनेम आहे...