आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिपाशाच्या नव-यापासून ते TV इंडस्ट्रीतील रामपर्यंत, या सेलिब्रिटींनी केले Secret Marriage 

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'ये है मोहब्बतें' या मालिकेत इशिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा बॉयफ्रेंड विवेक दाहिया येत्या 8 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. अलीकडेच दोघांनी प्री वेडिंग फोटोशूट केले असून विवेकच्या घरी शगुन सेरेमनी झाली. दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाची सध्या मीडियात खूप चर्चा आहे.

दिव्यांका आणि विवेकचे लग्न थाटामाटात होणार असून त्यांच्या चाहत्यांना लग्नाची तारीखसुद्धा माहित आहे. मात्र टीव्ही इंडस्ट्रीत असे अनेक कपल्स आहेत, ज्यांनी आपल्या लग्नाचा थांगपत्ता कुणाला लागू दिला नव्हता. यामध्ये बिपाशा नवरा करण सिंग ग्रोवरपासून ते टीव्ही इंडस्ट्रीत रामच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेल्या गुरमीत चौधरीच्या नावाचा समावेश आहे. या पॅकेजमधून जाणून घ्या, कोणकोणत्या टीव्ही सेलिब्रिटींनी थाटले होते गुपचुप लग्न...
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी
'राम' आणि 'सीता' बनून प्रसिद्ध झालेले गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी लग्नापूर्वी सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या कपलने कुणालाही लग्नाची बातमी कळू न देता फक्त फॅमिली मेंबर्सच्या उपस्थितीत लग्न केले होते.
करण सिंह ग्रोवर आणि श्रद्धा निगम
करण सिंह ग्रोवर आणि श्रद्धा कपूर यांनीही चुपके चुपके लग्न थाटले होते. मात्र लग्नाच्या दहा महिन्यांतच दोघे विभक्त झाले होते. त्यानंतर करणने टीव्ही अॅक्ट्रेस जेनिफर विंगेटसोबत लग्न केले मात्र हे लग्नसुद्धा फार काळ टिकले नाही. अखेर करणने 30 एप्रिल 2016 रोजी बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूसोबत लग्न केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, सिक्रेटली मॅरेज करणा-या स्टार्सविषयी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...