आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांका-विवेक, टीव्हीची 'नागिन' अदा खान यांनी घेतले एकताच्या बाप्पाचे दर्शन, हे सेलेब्सही दिसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्हीची ड्रामा क्वीन एकता कपूरच्या घरी बाप्पा विराजमान झाला आहे. एकताने तिच्या सर्व कलाकारांना गणपतीच्या दर्शनासाठी बोलवले होते. 'ये हैं मोहब्बतें'ची इशिता म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी , नागिन फेम अदा खान, करणवीर वोहरा, उवर्शी ढोलकिया, अनिता हसनंदनी, करन पटेल, त्याची पत्नी अंकिता भार्गव, मधुरिमा तुली, क्रिस्टल डीसूजा, शब्बीर अहलुवालिया, कांची सिंह, राज सिंह अरोरा हे सेलेब्सही पोहोचले होते. दिव्यांका पती विवेक दहीयासोबत दर्शनासाठी पोहोचली होती. तिने पिवळ्या रंगाचा सुट घातला होता तर अनिता हंसनंदानी लाल रंगाच्या सुटमध्ये दिसली. एकता कपूरने पिंक आणि ऑरेंज कलरचा लहंगा घातला होता तर वडील जितेंद्र फॉर्मलमध्ये होते. इतर सेलिब्रेटीही ट्रॅडीशनल लुकमध्ये दिसत होते. 
 
एकता कपूरने दिव्यांका, उवर्शी, क्रिस्टल, करनसोबत सेल्फी घेतली. पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर सेलिब्रेटीचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...