मुंबई- मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 'ससुराल सिमर का', 'सरोजनी', 'साथ निभाना साथिया', 'संतोषी मां' आणि 'सिलसिला प्यार का'सारख्या मालिकांची निर्माती रश्मी शर्माने वाढदिवस साजरा केला. यावेळी दीपिका सिंह, रतन राजपूत, सारा खान, शिल्पा शिरोडकर, रुबीना दिलाइक, मोहम्मद नाजिम आणि मनीष रायसिंघनसह अनेक टीव्ही सेलेब्स तिला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
रश्मीसाठी होते डबल सेलिब्रेशन...
- divyamarathi.comसोबत बातचीत करताना रश्मीने सांगितले, की या पार्टीमागे दोन कारणे आहेत.
- एका म्हणजे, बर्थडे सेलिब्रेशन आणि दुसरे म्हणजे तिचा पती पवन कुमारने निर्माता म्हणून त्याचा पहिला सिनेमा अनाऊंस केला.
- अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू स्टारर 'पिंक' सिनेमा रश्मी शर्मा आणि पवन कुमार निर्मित करणार आहेत.
- रश्मी यावेळी म्हणाली, 'टीव्ही निर्माती म्हणून मी नेहमी स्वच्छ मनोरंजन केले. सिनेमांतसुध्दा माझे हेच ध्येय राहिल.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रश्मीच्या बर्थडे बॅशमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची धमाल-मस्ती...