आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हाफ गर्लफ्रेंड'साठी एकता कपूरने होस्ट केली पार्टी, पोहोचले बॉलीवूड स्टार्सपेक्षा जास्त टिव्ही स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकता कपूर, मोहित सुरी, श्रद्धा कपूर आणि मौनी रॉय. - Divya Marathi
एकता कपूर, मोहित सुरी, श्रद्धा कपूर आणि मौनी रॉय.
मुंबई - एकता कपूरने नुकतीच मुंबईत ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी फिल्मची टीम वगळता बहुतांश टिव्ही स्टार्सचीच उपस्थिती होती. मौनी रॉय, अदा खान, अनिता हसनंदानी तिचा पती रोहित रेड्डी, रोनित रॉय त्याची पत्नी नीलिमा, मौनी रॉय, करण पटेल पत्नी अंकिता भार्गवसह, दिव्याका त्रिपाठी आणि विवेक दाहिया यांच्यासह मोना सिंह आणि अनेक टिव्ही स्टार्स यावेळी उपस्थित होते. 

ब्रेकअपनंतर एकाच पार्टीत दिसले करिश्मा-उपेन 
- विशेष म्हणजे 'बिग बॉस 8' मध्ये अफेयर सुरू झालेले उपेन आणि करिश्मा पार्टीत होते. मे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मार्च 2017 मध्ये उपेनने याला दुजोरा दिला होता. करिश्माने आपला वापर केला असे त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. 

बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींची होती उपस्थिती 
- चित्रपटाचा डायरेक्टर मोहित सुरी त्याची पत्नी आणि अॅक्ट्रेस उदिता गोस्वामी, मुलगी देवीबरोबर पार्टीत आला होता. त्याशिवाय प्रोड्यूसर एकता कपूरचा भाऊ आणि अॅक्टर तुषार कपूर, अॅक्ट्रेस प्रिती झंगियानी पती प्रवीण डाबससह तसेच अॅक्टर राजकुमार राव, प्रोड्युसर करण जोहर आणि अॅक्ट्रेस शमिता शेट्टी पार्टीत पोहोचले होते. 

50 कोटींपेक्षा अधिक कमाई 
- 22 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आठ दिवसांत देशांतर्गत 51 कोटींचा व्यवसाय केला आहे. 
- चेतन भगत यांच्या 'हाफ गर्लफ्रेंड' कादंबरीवर आधारित या चित्रपटात अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहेत. 
- चित्रपट एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूरसह मोहित सूरी आणि चेतन भगत यांनी प्रोड्यूस केला आहे. 

पुढील 17 स्लाइड्सवर पाहुयात, पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...