आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या TV celebs ना होते त्यांच्या Teacher वर Crush, या अभिनेत्याने लिहीले होते लव्ह लेटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - तसे पाहिले तर कोणताही दिवस मनवण्याचा कोणताच खास दिवस नसतो. पण तरीही त्याचे महत्तव वाढवण्यासाठी आपण खास अशा दिवसी सेलिब्रेट करतो. जसे की आज 5 सप्टेंबर. आज सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असे टीचर असतात ज्यांच्याकडून आपण खूप काही शिकतो. पण बऱ्याचदा असे होते की कुठला विशिष्ट शिक्षक आपला खास आवडीचा बनतो. असाच काहीसा अनुभव सेलिब्रेटींनीही आमच्या प्रतिनीधीसोबत शेअर केला आहे. जाणून घेऊया आज टीव्ही सेलिब्रेटींच्या टीचर क्रशविषयी...
 
 
अंकित गेरा 
मी जेव्हा 11वीत होतो तेव्हा मला माझ्या इंग्रजीच्या शिक्षिकेवर क्रश होता. त्यावेळी माझी हालत मै हु ना च्या शाहरुख खानसारखी झाली होती. ती टीचर 5 फुट 8 इंच होती आणि रोज शाळेत साडी घालून येत असे. तिचे केस फार लांब होते आणि रोज नवा परफ्युम लावून ती येत असे. इतर तासाला मी सर्वात शेवटच्या बेंचवर बसायचो पण त्यांच्या तासाला मी सर्वात पुढे असायचो. असे जवळपास 1 वर्ष चालले आणि मी लव्ह लेटरही लिहीले होते. पण मी अजूनही त्या शिक्षिकेला विसरु शकत नाही. 
 
रश्मी देसाई 
मला गणित विषय अजिबात आवडायचा नाही. पण मी जेव्हा आठवीत होते तेव्हा मला माझ्या गणिताच्या टीचरवर क्रश झाला. त्यानंतर मी गणिताकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मी त्यांचे नाव नाही सांगू शकत पण ते माझे पहिले क्रश होते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, टीव्ही सेलिब्रेटींचे इतर क्रश..
बातम्या आणखी आहेत...