आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : स्टार परिवार अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अवतरले टीव्ही स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - ऐश्वर्या सखूजा पती रोहित नागसोबत, उजवीकडे वर - दीपिका सिंह, खाली नंदीश संधू आणि रश्मी देसाई)
मुंबईः दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत 'स्टार परिवार अवॉर्ड्स 2015'चा ग्लॅमरस सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे रेड कार्पेटवर दिसले. 'नच बलिये 7' चे परिक्षक चेतन भगत आणि मास्टर मर्जी यांना हा इव्हेंट एन्जॉय करताना दिसले. मात्र अभिनेत्री प्रीती झिंटा यावेळी अनुपस्थित होती.
स्मॉल स्क्रिनचे प्रसिद्ध चेहरे दिव्यांका त्रिपाठी, हिना खान, देवलिना भट्टाचार्य, नजीम, दीपशिखा, विशाल सिंह, जुही परमार, दिशा वाकाणी, स्नेहा वाघ, गौरव चोप्रा, दिगंगना सूर्यवंशीसह अनेक सेलेब्स स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात येथे दिसले.
'दीया और बाती हम' या गाजत असलेल्या मालिकेत संध्या हे पात्र साकारणारी अभिनेत्री दीपिका सिंहने एका मुलाखतीत सांगितले, "मला माझे आजचे आउटफिट विशेष आवडले. ड्रेसमध्ये वापरण्यात आलेल्या मरुन कलरने त्याची शोभा अधिकच वाढवली आहे. मी आनंदी आहे, की गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी मला या सोहळ्यात सहभागी होता येतं. मला अद्याप एकही पुरस्कार मिळालेला नाही. ही अवॉर्ड सेरेमनी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्टार परिवार अवॉर्ड्स 2015ची खास छायाचित्रे...
सर्व फोटोः अजीत रेडेकर