आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लाइफमध्ये बोलणे तर सोडा, एकमेकांकडे बघणेही पसंत करत नाहीत TV चे प्रसिद्ध कपल्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजत टोकस (अकबर) सोबत परिधी शर्मा (जोधा), उजवीकडे - अनस रशीद (सूरज) आणि दीपिका सिंह (संध्या)
एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील लव्ह स्टोरीज घराघरांत प्रसिद्ध आहेत. मालिकांमध्ये झळकणा-या कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत असतं. ऑनस्क्रिनवरील कलाकारांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावत असते. मात्र या कलाकारांचे पडद्यामागील सत्य जाणून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. पडद्यावर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे टीव्ही कपल्स खासगी आयुष्यात एकमेकांशी बोलणे तर सोडा एकमेकांकडे बघणेही पसंत करत नाहीत.
परिधी शर्मा (जोधा) आणि रजत टोकस (अकबर)
'जोधा अकबर' या मालिकेचेच उदाहरण घ्या. मालिकेत जोधाची भूमिका साकारणारी परिधी शर्मा आणि अकबरच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता रजत टोकस यांच्यात खासगी आयुष्यात मात्र शीतयुद्ध सुरु आहे. खासगी आयुष्यात या दोघांचे मुळीच पटत नाही.
अनस रशीद (सूरज) आणि दीपिका सिंह (संध्या)
'दीया और बाती हम' या मालिकेत सूरजची भूमिका वठवणारा अनस रशीद आणि संध्याच्या भूमिकेत झळकणारी दीपिका सिंह यांच्यातील खासगी आयुष्यातील कुरबुरी कुणापासूनही लपून राहिलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने सार्वजनिक ठिकाणी अनसला थापड मारल्याचे वृत्त समोर आले होते.
Divyamarathi.com तुम्हाला छोट्या पडद्यावरील अशाच काही कपल्सविषयी सांगत आहे, ज्यांच्यात ऑनस्क्रिन जेवढे प्रेम आहे, तेवढीच खासगी आयुष्यात कटुता आहे..
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, टीव्ही इंडस्ट्रीतील अशाच काही ऑनस्क्रिन कपल्सविषयी...