मुंबई - टीव्ही शो 'द्वारिकाधीश- भगवान श्री कृष्ण'(2011) मध्ये श्रीकृष्णाची भूमिका करून प्रसिद्ध झालेला विशाल करवाल त्याच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहे. एका इंडोनेशियन मॉडेलने नुकताच दावा केला आहे की, ती त्याच्याबरोबर डीप रिलेशनशिपमध्ये आहे. या मॉडेलचे नाव गेब्बी वेस्ता (Gebby Vesta) आहे. तिने नुकताच एक बेडरूम व्हिडिओ पोस्ट करून त्याची गर्लफ्रेंड असल्याचे जाहीर केले आहे.
व्हिडीओमध्ये सेमी न्यूज दिसला विशाल..
- विशालची गर्लफ्रेंड असल्याचा दावा करणाऱ्या गेब्बीने एक बेडरूम व्हिडिओ पोस्ट केला आहे.
- त्यात गेब्बी तिला बेड टी देते तर विशाल अंथरुणात सेमी न्यूड दिसत आहे. मात्र व्हिडिओमध्ये फक्त गेब्बीचा आवाजच येत आहे. तिचा चेहरा दिसत नाही.
- हा व्हिडीओ शेयर करत गेब्बीने एक मोठे स्टेटसही लिहिले. त्यात तिने तिच्याबद्दल आणि विशालबद्दल सांगितले. (गेब्बीने व्हिडिओबद्दल सांगितले असले तरी याची सत्यता पडताळणी केल्याचा दावा आम्ही करत नाही.)
विशालने दिला ओळखायला नकार
- विशाल याबाबत म्हणाला की, तो गेल्या आठवड्यात इंडोनेशियाला गेला होता. भारतात परतल्यानंतर मला ही बातमी समजली.
- माझ्या एका मित्राने मला हे सांगितले आणि त्या मुलीने इन्स्टाग्रामवर माझा फोटो पोस्ट केल्याचे समजले.
- मॉडेलच्या मते ते सिंगापूरमध्ये भेटले होते आणि 2 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. विशालने मा६ कधीही सिंगापूरला गेला नसल्याचे सांगितले.
- हवं तर माझा पासपोर्ट चेक करा असे विशालचे म्हणणे आहे. या मुलीला भेटलोच नसल्याचे तो म्हणाला.
- मला फिरायला आवडते. नुकताच मी युरोप ट्रिपला गेलो होतो. त्याठिकाणी अनेक मित्रांनी माझ्याबरोबर फोटो काढले. याचा अर्थ मी त्यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे असा होत, नाही असे तो म्हणाला.
यामुळे करत नाही कारवाई..
- विशाल म्हणाला, गेब्बीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मी नाही. मी व्हिडिओ पाहिला आहे. तो कोण आहे हे मला माहिती नाही.
- या दरम्यान ममला मला असह्य झाल्यासारखे वाटत आहे. जर असे काही भारतात झाले असते तर मी नक्कीच केस केली असती.
- मी फक्त एकदाच इंडोनेशियाला गेलो आहे. तेही फक्त शोसाठी पाच दिवसांसाठी गेलो होतो.
- मी त्याठिकाणच्या चॅनेलशी बोलून तिच्यावर कारवाईसाठी बोळणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, विशाल करवालची गर्लफ्रेंड असल्याचा दावा करणाऱ्या मॉडेलचे PHOTOS..