आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पाटेकर यांच्यामुळे टीव्ही मालिकांत आली ही अभिनेत्री, सोबत केले होते चित्रपटात काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सुंदर चेहरा आणि टॅलेंट असतानाही एंटरटेनमेंट क्षेत्रात यश मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात, असे म्हणणे आहे टीव्ही कलाकार भूमिका गुरुंगचे. तिने सांगितले की तिचा पहिला चित्रपट नाना पाटेकर यांच्यासोबत होता. या चित्रपटात माझा रोल छोटा होता पण माझी मेहनत पाहून नाना पाटेकर यांनी मला प्रोत्साहीत केले आणि याच क्षेत्रात करीअर करण्याचा सल्ला दिला. 
 
गुलाबी रंगाच्या चष्म्यातून पाहते जग..
-‘स्टार भारत’वर सुरु झालेली मालिका ‘निमकी मुखिया’मध्ये भूमिका लीड रोल करत आहे. तिने सांगितले की, निमकीचे वडील गरीब आहेत तरीही निमकी नेहमीच गुलाबी चष्म्यातून जग पाहत असते. ती नेहमीच बॉलिवूडच्या स्वप्नात रंगलेली असते.  
- गावातील साधे जीवन तिला आवडत नसले तरी ती त्यात खुश राहत असते. ती लग्नाचे स्वप्न रंगवत असते. 
- ती राजकारणापासूनही दूर असते पण अश्या काही गोष्टी घडतात की ती गावातील पहिली महिला सरपंचपदी जाऊन बसते. 
- भूमिकाने सांगितले की, मालिकेतील तिची भूमिका ही इतर कोणत्याही हिंदी मालिकांतील नायिकांपेक्षा वेगळी आहे. या मालिकेच्या प्रमोशनसाठी   निमकी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील 15 लहान गावांत रॅली काढणार आहे. शनिवारी निमकी भोपाळमध्ये होती. 

- निमकीचे म्हणणे आहे की, मुलीची फर्स्ट ड्युटी तिची ब्युटी आहे. भोपाळमध्ये कार्यकर्त्यांच्या एका तुकडीने स्टोअर्स, बाजार आणि हेरीटेज साईट्सचा दौरा केला.
पुढच्या स्लाईडवर वाचा, इतर काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...