आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tv Serial Mahabharat Shooting In Gujarat And Various Places

द्रौपदीने मारला डोळा, तर श्रीकृष्ण घेतोय डुलक्या, पाहा 'महाभारता'च्या सेटवरील खास छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार प्लसवर वाहिनीवर नव्याने दाखल झालेल्या ‘महाभारत’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरु झालेल्या या मालिकेच्या सेटसाठी तब्बल 120 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
सिद्धार्थ तिवारी दिग्दर्शित या मालिकेत कृष्णाची भूमिका सौरभ राज जैन याने साकारली आहे, तर अर्जुनच्या भूमिकेत शाहीर शेख, युधिष्ठिरच्या भूमिकेत रोहित भारद्वाज, भीमाच्या भूमिकेत सौरव गुर्जर, दुर्योधनच्या भूमिकेत अर्पित रंका, शकुनीमामाच्या भूमिकेत पुनीत भट्ट, पितामहच्या भूमिकेत अरव चौधरी, धृतराष्ट्रच्या भूमिकेत अनुप सिंह, द्रौपदीच्या भूमिकेत पूजा शर्मा, कुंतीच्या भूमिकेत शफख नाज आणि कर्णाच्या भूमिकेत अहम शर्मा हे कलाकार सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत.
दमदार अभिनयासोबतच प्रेक्षकांच्या आकषर्णाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो या मालिकेचा भव्य-दिव्य सेट. ‘महाभारत’चा सेट, स्टारकास्टवर प्रचंड खर्च करण्यात आला आहे. महाभारताचा राजेशाही थाट दाखवण्यासाठी अशा सेटची निर्मिती करण्यात आली आहे. गुजरातमधील उमरगाम येथे दहा एकरमध्ये हा सेट उभारण्यात आला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक ओमुंग कुमार यांनी हा सेट डिझाइन केला आहे.
परदेशातही चित्रीकरण
महाभारत या मालिकेचे चित्रीकरण भारतासह परदेशातील अनेक नयनरम्य ठिकाणी करण्यात आले आहे. काश्मीर, जयपूर जैसलमेर, अहमदाबाद, बेळाघाट, श्रीलंका आणि नेपाळमधील काही शहरांत मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला गुजरातमधील उमरगाम येथील चित्रीकरणाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. मालिकेची संपूर्ण टीम धमाल-मस्ती करत चित्रीकरण करताना या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. फावल्या वेळेत श्रीकृष्णाच्या भूमिकेत असेला सौरभ राज जैन डुलकी घेताना दिसतोय. तर द्रौपदीच्या भूमिकेत असलेली पूजा शर्माचे खट्याळ रुप या छायाचित्रामध्ये पाहायला मिळतंय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा चित्रीकरणाची आणि सेटची खास छायाचित्रे...