आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Real Life मध्ये असे दिसतात TV चे राम-सीता, पाहा इतर स्टारकास्ट कशी दिसते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः विजयादशमीचा सण मंगळवारी उत्साहात सर्वत्र साजरा झाला. विजयादशमीच्या निमित्ताने राम आणि रावण यांच्यातील युद्धाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. रामानंद सागर यांच्या गाजलेल्या 'रामायण' मालिकेची चर्चा आजही रंगते. या मालिकेतील श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि रावण यांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. या मालिकेत अभिनेता अरुण गोविल यांनी भगवान श्रीरामाची भूमिका साकारुन भरपूर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली होती. तर दिवंगत अभिनेते दारा सिंग यांनी हनुमान बनून आपली एक वेगळी प्रतिमा तयार केली होती. अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेला रावण आजही लोक विसरु शकलेले नाहीत.
25 जानेवारी 1987 ते 31 जुलै 1988 या काळात प्रसारित झालेली ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. ही मालिका संपून 26 वर्षांचा काळ लोटला आहे. 'रामायण' ही मालिका नवीन कलाकारांसोबत नव्या संचात आणि ग्लॅमरसोबत अनेकदा टेलिव्हिजनवर दाखल झाली आहे. मात्र पहिल्या 'रामायण'ची सर इतर कुठल्याही मालिकेला येऊ शकली नाही.

रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये काम केलेल्या स्टार्सची जुनी प्रतिमा आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. मात्र एवढ्या वर्षांत या मालिकेतील कलाकारांच्या चेह-यात बराच बदल झाला आहे. वरील छायाचित्रात अभिनेता अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया दिसत आहेत. शोमध्ये दोघांनी राम आणि सीताची भूमिका साकारली होती.

सीता बनण्यापू्र्वी दीपिकाने केले अनेक सिनेमे...
29 एप्रिल 1965 रोजी जन्मलेल्या दीपिकाने रामायण मालिकेत काम करण्यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. 'भगवान दादा' (1986), 'रात के अंधेर में' (1987), 'खुदाई' (1994), 'सुन मेरी लैला' (1985), 'चीख' (1986), 'आशा ओ भालोबाशा' (बंगाली, 1989) आणि 'नांगल' (तमिल, 1992) या सिनेमांमध्ये अभिनेत्री काम केले आहे. यापैकी जास्तीत जास्त सिनेमे हे बी ग्रेड होते.

आता कॉस्मेटिक कंपनीत मार्केटिंग टीम हेड आहे दीपिका...
दीपिकाचे लग्न हेमंत टोपीवालासोबत झाले आहे. त्यांची टिकली आणि टोज नेलपॉलिशची कंपनी आहे. दीपिका आणि हेमंत यांना निधी टोपीवाला आणि जुही टोपीवाला या दोन मुली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, लग्नानंतर दीपिकाने आपले आडनाव बदलले आणि आता ती तिच्या नव-याच्या कंपनीत मार्केटिंग टीमची हेड आहे.

राम नगरमध्ये जन्मले टीव्हीचे राम...
टीव्हीचे राम अर्थातच अभिनेते अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 रोजी राम नगर (मेरठ) उत्तर प्रदेशात झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी काही नाटकांमध्ये काम केले. टीनेज आयुष्य त्यांचे सहारनपूर येथे गेले. त्यांनी सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र अरुण यांना आयुष्यात काही तरी वेगळे करायचे होते. बिझनेस करण्याच्या उद्देशाने ते मुंबईत आले मात्र नंतर येथे त्यांनी अभिनयात करीअर करण्याचा निर्णय घेतला. अरुण यांना छोट्या पडद्यावरील रामच्या भूमिकेतून पहिल्यांदा लोकप्रियता मिळाला. मात्र त्यांना पहिली संधी ही 1977 मध्ये ताराचंद बडजात्यांच्या पहेली या सिनेमातून मिळाली होती. 'सावन को आने दो' (1979), 'सांच को आंच नहीं' (1979), 'इतनी सी बात' (1981), 'हिम्मतवाला' (1983), 'दिलवाला' (1986), 'हथकडी' (1995) आणि 'लव कुश' (1997) या सिनेमांमध्ये ते झळकले आहेत.

अरुण गोविल यांचे कुटुंब...
अरुण त्यांच्या आईवडिलांच्या आठ अपत्यांपैकी चौथ्या क्रमांकावर येताता. त्यांना सहा भाऊ आणि दोन बहिणी आहेत. अरुण यांच्या पत्नीचे नाव श्रीलेखा गोविल आहे. त्यांना अमल आणि सोनिका ही दोन मुले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा रामानंद सागर यांच्या 'रामायण'मधील इतर कलाकारांची छायाचित्रे...

नोटः 'रामायण' या मालिकेतील काही स्टार्सचे निधन झाले आहे, मात्र लोकांच्या मनात आजही त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा अगदी ताज्या आहेत. त्यामुळे या पॅकेजमध्ये आम्ही त्यांचाही समावेश केला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...