आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा 'हम पांच'च्या स्टार कास्टच्या LOOKमध्ये 16 वर्षांत झालेला बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो पूर्वी आणि आता : खरे नाव - विद्या बालन, भूमिकेचे नाव - राधिका)
मुंबईः डेली सोप क्वीन एकता कपूरने जेव्हा 'हम पांच' ही विनोदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती, तेव्हा ही मालिका एवढी गाजेल असा विचारदेखील कुणी केला नसेल. या मालिकेतील पात्र, त्यांचे संवाद, त्यांची कॉमिक टायमिंग आणि लूक आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. उल्लेखनीय म्हणजे या मालिकेचे दोन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले. पहिले पर्व 1995 ते 1999 एवढा काळ चालले तर दुसरे पर्व 2005 ते 2006 पर्यंत चालले. या मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता.
आता 'हम पांच'च्या पहिल्या पर्वाला संपून 16 वर्षांचा काळ लोटला आहे. अभिनेते अशोक सराफ, विद्या बालन, प्रिया तेंडुलकर, राखी टंडन, शोमा आनंद, वंदना पाठक, भैरवी रायचुरा आणि प्रियांका मेहरा या कलाकारांनी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आज ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु नाहीये, मात्र माथूर फॅमिली आजही प्रेक्षकांच्या घरातील अविभाज्य भाग बनली आहे.
'हम पांच' या मालिकेत मिस्टर माथूरची दुसरी मुलगी राधिकाची भूमिका साकारुन अभिनेत्री विद्या बालनने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मालिकेच्या पहिल्या पर्वात विद्या बालन झळकली होती. त्यानंतर ही भूमिका अभिनेत्री अमिता नांगियाने साकारली होती. 'हम पांच' मालिकेला रामराम ठोकल्यानंतर विद्या बालनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. त्यानंतर विद्याला केवळ स्टारडमच मिळाले नाही, तर तिच्या लूक आणि लाइफ स्टाइलमध्येही कमालीचा बदल घडून आला आहे.
आज 'हम पांच' ही मालिका बंद होऊन 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. Divyamarathi.com तुम्हाला तेव्हापासून ते आजपर्यंत या शोच्या स्टारकास्टच्या लूकमध्ये किती बदल घडून आला आहे, हे दाखवत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'हम पांच'च्या स्टारकास्टचे पूर्वीचे आणि आत्ताचे रुप...