आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'जोधा अकबर'च्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी, लवकरच डबाबंद होणार मालिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः 'जोधा अकबर' फेम रजत टोकस आणि परिधी शर्मा)
मुंबई- 'जोधा अकबर' या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. याचे कारण शोचा सतत ढासळत जाणारा टीआरपी असल्याचे सांगितले जाते.
सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, मालिकेतील सलीम (रवी भाटिया) हे पात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरले. सोबतच मालिकेतील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली जोधा उर्फ परिधी शर्मा हिचा मालिकेसोबतचा करारसुद्धा संपत आला आहे. याच कारणांमुळे वाहिनीने आता ही मालिका डबाबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अद्याप बालाजी टेलिफिल्म्सच्या वतीने याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते मालिका बंद करु इच्छित नाहीत. हा निर्णय वाहिनीचा आहे.
18 जून 2013 रोजी छोट्या पडद्यावर दाखल झाली मालिका...
या मालिकेची सुरुवात 18 जून 2013 रोजी झाली. मालिकेतील रजत टोकस आणि परिधी शर्मा यांची केमिस्ट्री लोकांना भावली. विशेषतः परिधी शर्माची मोठी फॅनफॉलोईंग निर्माण झाली.
येत्या 18 जूनला या मालिकेला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. आता आणखी किती दिवस प्रेक्षक ही मालिका बघू शकणार, हे पाहुयात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'जोधा-अकबर'ची रोमँटिक केमिस्ट्री (फोटोजमध्ये) जी मालिका ऑफ एअर झाल्यानंतर प्रेक्षक मिस करतील...